Devendra Fadnavis On IPS Deven Bharti In Pune | मुंबईमध्ये विशेष पोलिस आयुक्त म्हणून देवेन भारतींच्या नियुक्तीची गरज का भासली? फडणवीस म्हणाले – ‘खुप काही वेगळं केलं नाही, फक्त मिसींग लिंक कॅरी आऊट केली’ (Video)

पुणे (नितीन पाटील) : Devendra Fadnavis On IPS Deven Bharti In Pune | वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईत विशेष पोलिस आयुक्त (Special Commissioner Of Police, Mumbai) म्हणून नियुक्ती करून आपण मुंबई पोलिस दलात असलेली एक मिसींग लिंक कॅरी आऊट केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. गुरूवारी ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईत देवेन भारती यांच्या नियुक्तीची गरज का भासली आणि त्यांच्यावर नेमकी काय जबाबदारी असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. (Devendra Fadnavis On IPS Deven Bharti In Pune)

 

याबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साधारणपणे पुर्वी मुंबईमध्ये पोलिस आयुक्तांचं (सीपी) Commissioner Of Police पद हे एडीजी – ADG (अतिरिक्त पोलिस महासंचालक – Additional Director General Of Police) लेव्हलचं होतं. ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर ते पद मी डीजी – DG (पोलीस महासंचालक – Director General Of Police) लेव्हलचं केलं. त्यामुळे साधारणपणे आपल्या हैराकीमध्ये ज्वाइंट सीपी (Joint Commissioner Of Police) पद Jt CP हे आयजी – IG (विशेष पोलिस महासनिरीक्षक – Inspector General Of Police) लेव्हलचं आहे. आयजी लेव्हलच्या अधिकार्‍यांनी एडीजी लेव्हलच्या अधिकार्‍यांना रिपोर्ट करायचा असतो आणि एडीजी लेव्हलच्या अधिकार्‍यांनी डीजी लेव्हलच्या अधिकार्‍यांना रिपोर्ट करायचा असतो. मात्र, मुंबईची सगळी व्याप्ती पाहता तिथलं पोलिस आयुक्तांचं पद हे आपण डीजी लेव्हलचं केलं पण मध्ये एडीजी लेव्हलचं पद आपण निर्माण करू शकलो नव्हतो. काही कारणामुळं ते राहून गेलं होतं.

 

त्यामुळे आता एडीजी लेव्हलचं पद निर्माण केलं आहे. हे पद आपण त्याला नाव जरी स्पेशल सीपी (विशेष आयुक्त) दिलं असलं तरी मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या अधिनस्तच हे पद आहे. त्यांना मुंबईच्या पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करायचा आहे. जे काही आयजी लेव्हलचे ज्वाइंट सीपी आहेत त्यांना विशेष पोलिस आयुक्तांना रिपोर्ट कारायचा आहे. त्यामुळे आपण खुप काही वेगळे केले आहे असं मला काही वाटत नाही. एक जी मिसींग लिंक होती ती आपण आता कॅरी ऑऊट केली असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. (Devendra Fadnavis On IPS Deven Bharti In Pune)

 

 

राज्य पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या (Maharashtra IPS Officer Transfer) डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच झाल्या होत्या. त्यावेळी देवेन भारती (IPS Deven Bharti) यांची नियुक्ती प्रतिक्षेत दाखवण्यात आली होती. अखेर राज्य गृह विभागाकडून बुधवारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतील पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. देवेन भारती हे सन 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे सर्वात पॉवरफुल पोलिस अधिकारी आहेत अशी चर्चा व्हायची. त्यावेळी देवेन भारती हे मुंबई पोलिस दलामध्ये सह आयुक्त Jt CP L&O (कायदा व सुव्यवस्था – Law & Order ) आणि त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख ATS Chief (Anti Terrorist Squad) या पदावर कार्यरत होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) आल्यानंतर भारती यांची एटीएसच्या प्रमुख पदावरून इतर ठिकाणी बदली करण्यात आली. ठाकरे सरकारच्या (Thackeray Govt) काळात भारती हे अकार्यकारी पदावर होते.

राज्यात सरकार बदलल्यानंतर देखील काही काळ गृह विभागाकडून (Home Department Maharashtra)
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या.
मात्र, डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच बदल्या करण्यात आल्या आणि आता मुंबई पोलिस दलामध्ये विशेष पोलिस आयुक्तचं पद निर्माण करण्यात आलं.
हे पद निर्माण केल्यानंतर पोलिस वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई पोलिस दलात निर्माण केलेलं
विशेष पोलिस आयुक्त पद हे केवळ एक मिसींग असलेली लिंक कॅरी आऊट करण्यासाठी केल्याचं सांगितलं आहे.
त्यामुळे पोलिस आणि राजकीय वर्तुळामध्ये होणार्‍या चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis On IPS Deven Bharti In Pune | Why was there a need for
the appointment of Deven Bharti as Special Commissioner of Police in Mumbai?
Devendra Fadnavis said – ‘Didn’t do anything different, just carried out the missing link’ (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | निवडणुका कधी होणार? शरद पवारांनी सांगितली तारीख, कार्य़कर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना

State Election Voters | अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Amit Shah | राम मंदिर कधी तयार होणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केली तारीख (व्हिडिओ)