Devendra Fadnavis On Protest | फडणवीसांचा सक्त इशारा, हिंसेला थारा दिला जाणार नाही, घरे जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर ३०७ कलमांतर्गत गुन्हे दाखल होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Protest | शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही, असा सक्त इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना दिला आहे. काल बीड व इतर काही ठिकाणी मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) हिंसक लागले. आंदोलकांनी जाळपोळ करत राजकीय नेत्यांना लक्ष्य केले होते. यावरून फडणवीस यांनी हा इशारा दिला आहे. (Devendra Fadnavis On Protest)

मराठा आरक्षण आंदोलनातील हिंसाचारावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मकतेने पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत आश्वासन दिले आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत बांधिल आहे.

फडणवीसांनी म्हटले की, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषकरून ज्याप्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिनिधींची घरे जाळली. काही विशिष्ट्य समाजाच्या लोकांना टार्गेट केल, हॉटेल, दवाखाने जाळले, प्रतिष्ठान जाळली, अशा प्रकारची कृत्य केली आहेत. हे प्रकार अत्यंत चुकीचे आहे. त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल. (Devendra Fadnavis On Protest)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विशेष करून लोक घरात असताना घरे जाळण्याचा जो प्रयत्न झाला आहे, त्याचे सर्व व्हिडीओ फुटेज मिळालेले आहेत. त्यामधून ५०-५५ लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची ओळख पटवली जात आहे. या सर्व लोकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न ३०७ कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

फडणवीस म्हणाले, अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न,
कुणाची मालमत्ता जाळण्याचा प्रयत्न असले प्रकार होत असतील,
तिथे पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. कडक कारवाई केली जाईल. जिथे शांततापूर्ण आंदोलने सुरू असतील तिथे कुठलीही कारवाई केली जाणार नाही.

ते पुढे म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.
मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही.
अशी परिस्थिती असलेल्या ठिकाणी सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.
असे प्रकार करणाऱ्यांना जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील.

फडणवीस यांनी म्हटले की, ज्यावेळेस अशा घटना समोर येत होत्या.
त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते त्यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे.
त्याबाबतच्या व्हिडीओ फुटेजची तपासणी केल्यानंतर त्याची माहितीही तुम्हाला देण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Firecracker Stalls In Pune | फटाका विक्री स्टॉलच्या ऑनलाईन लिलावामुळे महापालिकेचे उत्पन्न पाच पटीने वाढले

Pune PMC News | महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी सेवानिवृत्त