Devendra Fadnavis On Raj Thackeray | राज ठाकरेंचे आधीचे बोल गुलुगुलु वाटायचे अन् आता खाजवायला होतंय- देवेंद्र फडणवीस

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी घेतलेल्या दोन सभांमध्ये थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

 

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे त्यांच्यासोबत होते तेव्हा त्यांचे बोल गुलुगुलु वाटत होते, गुदगुल्या होत होत्या.
मात्र आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होत असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.

 

साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं, असं म्हणत राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.
त्यासोबतच, राज ठाकरे हे भाजपच्या हातचे बाहुले असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली होती. (Devendra Fadnavis On Raj Thackeray)

 

दरम्यान, राज ठाकरे यांचा घाव वर्मी लागतोय. भाजपला (BJP) कोणालाही समोर करण्याची गरज नसल्याचंही फडणवीस म्हणाले.
राज ठाकरेंवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज ठाकरेंना ‘अर्धवटराव’ अशी उपाधी देत खिल्ली उडवली होती.

 

Web Title :- Devendra Fadnavis On Raj Thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा