Devendra Fadnavis | ‘मोदी हटाव मेळावा नसून ‘परिवार बचाव’ मेळवा, आश्चर्य वाटतं उद्धव ठाकरे…’, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांच्या बैठकीवर बोचरी टीका (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अमेरिकेत आहेत तर दुसरीकडे बिहारच्या पाटण्यात 15 विरोधी पक्षांनी एकत्रित मेळावा (Opposition Party Meeting) घेतला आहे. या मेळाव्याला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहभाग घेतला आहे. अशा मेळाव्यांचा काहीही फायदा होणार नाही असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. सध्या सुरु असलेला मेळावा म्हणजे मोदी हटाव मेळावा नसून ‘परिवार बचाव’ मेळावा आहे, असा टोला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. तसेच उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) एकाच मंचावर आल्याच्या मुद्यावरुन त्यांनी बोचरी टीका केली.

ही तर परिवार बचाव बैठक

विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशा प्रकारचा प्रयत्न 2019 ला पण झाला होता. तेव्हाही हे लोक एकत्र आले होते, मात्र फायदा झाला नाही. भारतातील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देत आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की एनडीए (NDA) मागच्या पेक्षाही मोठ्या संख्येने यश मिळवेल. पाटण्यात जी बैठक सुरु आहे, ती मोदी हटाव नव्हे, तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे. सगळे परिवार एकत्र आले आणि परिवार वाचवत आहेत. कारण त्यांच्यासाठी राज्य चालवणं म्हणजे धंदा आहे. भाजपकरता (BJP) सत्ता म्हणजे सेवा करण्याचे काम आहे, मात्र हे सर्वजण आपल्या कुटुंबाकडे सत्ता कशी राहिल यासाठी एकत्र आले आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या मेळाव्याचा समाचार घेतला.

आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं…

2019 ला हे सगळे विरोधक एकत्र आले होते. मात्र जनता मोदींच्या पाठीशी आहे हे आम्ही तेव्हा पाहिले. 2024 ला मागच्यापेक्षा मोठं यश मिळवू असा विश्वास आम्हाला आहे. अशा प्रकारचे मेळावे केले तर काही फायदा किंवा परिणाम होणार नाही. मात्र एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की भाजपला मेहबुबा मुफ्तींसोबत केलेल्या युतीवरुन टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आज त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या बाजूलाच बसलेत. त्यामुळे स्वत:चा परिवार वाचवण्यासाठी आणि परिवारवादी पार्टी वाचवण्यासाठी सगळ्या तजडोडी करायला हे लोक तयार आहेत. पण त्यांनी काहीही केले तरी त्याचा फायदा होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नितीश कुमारांच्या घरी बैठकीचे आयोजन

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीमध्ये किमान
20 भाजपेतर पक्षांचे प्रमुख व नेते सहभागी झाले आहेत. तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) सर्वेसर्वा
ममता बनर्जी (Mamata Banerjee), आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल
(Arvind Kejriwal), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann), पीडीपीच्या (PDP) प्रमुख मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel), काँग्रेस अध्यक्ष (Congress President) मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal), जयराम रमेश (Jairam Ramesh) उपस्थित आहेत.

Web Title :   Devendra Fadnavis | oppositions alliance in patna means family saving activity and uddhav thackeray compromises everything says devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering, Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globall