Devendra Fadnavis । केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे खा. प्रीतम मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Cabinet Reshuffle) काल पार पडला. एकूण 43 जणांना कॅबिनेट, राज्यमंत्री देण्यात आले. महाराष्ट्रातील एकूण चार जणांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. मात्र, त्यात दिवंगत भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची कन्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी दिसून येत आहे. तर माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह मुंडे गटात नाराजी पसरली आहे. यावरून भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही. निर्णय हा पक्षात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला असल्याचं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.

नाशिक (Nashik) येथे शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून मुंडे भगिनी नाराज, हे कोण म्हणत आहे. अशी काहीही चर्चा नाही. मंत्रिपद वाटपाचा निर्णय, पक्ष वरीष्ठ स्तरावरून घेतला जात असतो. त्यामुळे मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही’ असे त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

मुंडे गटात नाराजी ?

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून समाज माध्यमांवर (Social media) एक पोस्ट प्रसारित होत आहे. या पोस्टमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे किती योगदान होते. असं या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तर, ही पोस्ट पंकजा मुंडे यांचासाठी काम करणाऱ्या माजी सहकारी संकेत सानप याने लिहिली आहे.
दरम्यान त्यात असा उल्लेख करण्यात आला आहे की, ‘तुमचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊनही तुम्ही कुणाच्या उंबरठ्यावर जाऊन लॉबिंग करत नाही.
हे सारं प्रस्थापित शक्ती केंद्रांनी या आधीही अनुभवलेलं आहे. त्यामुळे ती चुक पुन्हा होणे नाही. असं त्यात म्हटलं आहे.

दरम्यान, एका गोपीनाथ मुंडेचे दोन गोपीनाथ मुंडे कसे होऊ देतील हो? राजकीय सत्ताधाऱ्यांपैकी कुणालाच नको आहेत दोन-दोन गोपीनाथ मुंडे.
आज आपल्या पंकजाताईचं वय 42 आहे तर प्रितमताईंचं 38,असे अनेक घाव सोसत सोसत तर त्यांना गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे. असं त्यात नमूद केलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Devendra Fadnavis | pritam munde upset over not getting ministerial post devendra fadnaviss first reaction

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल;
प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी