Devendra Fadnavis |  ‘उद्धव ठाकरेंचे ‘ते’ भाषण दाखवा, 1 हजार मिळवा’, देवेंद्र फडणवीसांची ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप (BJP) नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मध्य प्रदेशातील भाजपच्या कार्यक्रमात समान नागरी कायदा (Uniform Civil Law) विषयाला हात घातला. या विषयावर बोलताना मोदींनी मुस्लिमांना (Muslims) आवाहन केलंय. त्यानंतर, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या (Muslim Personal Law Board) अध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावरुन, आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईत उद्धव ठाकरेंचा मताचा टक्का कमी झाला आहे. मराठी आणि नॉन मराठी मतं (Non Marathi votes) कमी झाल्याने कमी झालेल्या मतांचा टक्का भरुन काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लीम वोट बँक जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला. उद्धव ठाकरेच आपल्यासाठी नवीन मसिहा असल्याचं त्यांना वाटतंय. म्हणूनच, आज समान नागरी कायद्या संदर्भात चर्चेसाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी ना शरद पवारांकडे (Sharad Pawar) गेले, ना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याकडे. ते थेट उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच बाळासाहेब ठाकरे समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ होते, मग उद्धव ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा द्यायला पाहिजे, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले की, उद्धव ठाकरे म्हणतात हा महत्त्वाचा विषय नाही, मी विकासाबद्दल बोलतो, मी पाणी, रस्ते आणि वीज यासंदर्भात बोलतो, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा दुर्लक्षित केला तर काय? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी थेट ऑफरच दिली आहे. उद्धव ठाकरेंचं वीज, रस्ते, पाणी आणि विकासासंदर्भातील एक भाषण दाखवा, मी तुम्हाला एक हजार रुपये देतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ऑफर आणि चॅलेंज दिलं. एक हजार रुपये घ्या माझ्याकडून, उद्धव ठाकरे तसं बोलतच नाहीत. तसेच बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, समान नागरी कायद्यावर भाष्य करण्याचं धाडस दाखवलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Web Title :  Devendra Fadnavis show that speech of uddhav thackeray get 1 thousand devendra fadnavis offer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Pune Crime News | हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरद मोहोळसह 7 जणांची अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Pune Police Crime Branch | भवानी पेठेतून 10 लाख 50 हजाराचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून एकाला अटक