Devendra Fadnavis | महिलांवरील अत्याचार हा गंभीर आणि चिंताजनक विषय, पण विरोधकांचे आरोप बिनबुडाचे – देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांवरील अत्याचार (Violence Against Women) हा गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. मात्र विरोधक याचे भांडवल करत बिनबुडाचे आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत (Monsoon Session 2023) चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिला अत्याचार, महिला गायब, सायबर गुन्हेगारी (Cyber Crime) यासह प्रत्येक विरोधकांच्या मुद्यावर त्यांनी उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, चर्चेच्या माध्यमातून राज्याची परिस्थिती काय आहे? यावर चर्चा करता येते. सदस्याकडून जे प्रश्न उपस्थित केले जातात, त्यामुळे वस्तुस्थितीची जीणीव होते. विरोधी पक्षाच्या प्रस्तावाचा सूर हा महिला अत्याचार वाढले आहेत, असा होता. महिलांवरील अत्याचार हा गंभीर व चिंताजनक विषय आहे. महिला पुढे येत आहेत. अत्याचाराच्या विरोधात महिला सातत्याने तक्रार नोंदवत आहेत, ही समाधानाची बाब आहे.

https://fb.watch/ma64PEpYWA/

सामाजिक दबावाखाली असे अत्याचार दाबले तर ते कमी करता येणार नाहीत. केरळ, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यानंतर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. पण गुन्ह्यांची तुलना ही प्रति लाख व्यक्तींमागे किती गुन्हे हे प्रमाण लावायला हवे. तर महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. महिलांसंदर्भात तक्रार झाली की ती FIR मध्ये रुपांतरित करण्याचा कायदा केला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश पहिल्या तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महिला घरुन निघून जाणे व अपहरणाचा (Kidnapping) मुद्दा सातत्याने मांडला जात आहे. विरोधकांनी याबाबत सातत्याने टीका केली. हे खरं आहे की, देशात व महाराष्ट्रात महिला हरवणे किंवा पळवून नेण्याच्या घटना आढळतात. पॉक्सो (POCSO Act) नुसार 17.2 टक्के क्राईम रेट महाराष्ट्रात (Maharashtra Crime Rate) आहे. लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर आहे.

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानुसार 72 तासानंतरच मिसिंग रिपोर्ट करावा लागतो. त्यांचे अपहण झाल्याचे समजून तपास करावा लागतो. अशा प्रकारे महिलांबाबत अपहण झाले किंवा निघून गेल्या त्याचे गुन्हे 2021 साली 86 टक्के उघडकीस आले आहेत 2023 मध्ये 63 टक्के गुन्हे उघडकीस आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action)
करण्यात आली आहे. तडीपारची 1651 प्रकरणे केली आहेत.
मोक्का अंतर्गत MCOCA (Mokka Action) 92 प्रकरणे करण्यात आली आहेत.
अमली पदार्थाबाबत देखील आपण जॉइंट टास्क फोर्स (Joint Task Force) केलेले आहेत.
मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या स्त्रोतापर्यंत आपण पोहोचलो आहोत.
सायबर गुन्ह्यात देखील वाढ झाली आहे. स्ट्रीट क्राईमपेक्षा हळूहळू सायबर क्राईम वाढत आहे.
सायबर क्राईममध्ये आपले राज्य पाचव्या स्थानी आहे. आपण 43 सायबर लॅब (Cyber Lab)
सुरु करत आहोत. देशातला सर्वात अॅडव्हान्स सायबर प्लॅटफॉर्म असेल,
असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 50 हजाराच्या लाचप्रकरणी पुण्यातील पोलिस अधिकार्‍याला
अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक