Devendra Fadnavis | आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde-Fadnavis Government) खातेवाटप आज जाहीर करण्यात आले आहे. यानंतर 5 ते 6 मंत्री नाराज असल्याचे वृत्त असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. ते आज खातेवाटपानंतर माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis)

 

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, आमच्यात खात्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा वाद नाही. त्यामुळे त्यांना वाटले आमच्याकडील एखादे खाते त्यांना हवे आहे, तर आम्ही देऊ आणि आम्हाला वाटले, की त्यांच्याकडील एखादे खाते आम्हाला हवे आहे, तर आम्ही ते घेऊ. तसेच, पुढचा विस्तार केव्हा करायचा, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. ते योग्य वेळ पाहून ठरवतील. (Devendra Fadnavis)

 

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंत्री मिळालेल्या खात्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू. सध्या आमचे मंत्रीमंडळ अर्ध्यापेक्षाही छोटे आहे. यामुळे अधिक भार आमच्यावर आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, लवकरच पुन्हा आमचा विस्तार होईल. तेव्हा यातील काही खाती आमच्या सहकार्‍यांकडे जातील. तोवर, ज्यांच्याकडे जी खाती आली आहेत त्यांना संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू.

 

खाते कोणते ते महत्वाचे नाही, तर ते चालवणारे योग्य व्यक्ती असायला हवेत. त्या दृष्टीने, सध्या तरी असे वाटते,
की पुढील विस्तारात त्यांच्याकडची खाती ते त्यांच्या लोकांना देतील आणि आमच्याकडची खाती आम्ही आमच्या लोकांना मिळतील.
मात्र, त्यात काही बदल करायचा असेल, तर तसे आम्ही बसून करू शकतो.

 

मंत्रिमंडळाच्या पुढील विस्ताराबाबत फडणवीस म्हणाले की, पुढील विस्तार केव्हा करायचा,
हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. ते योग्य वेळ पाहून ठरवतील.

 

Web Title :- Devendra Fadnavis | we do not have disputes regarding ministers portfolio says devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shinde-Fadnavis Government | शिंदे- फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कुणाला कोणते खाते मिळाले

 

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री कोण ? नाव ठरलं ?

 

Vinayak Mete Accident | मुंबईतील बैठकीची वेळ कोणी बदलली ? दुपारी 4 ऐवजी 12 केली