Vinayak Mete Accident | मुंबईतील बैठकीची वेळ कोणी बदलली ? दुपारी 4 ऐवजी 12 केली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Mete Accident | शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचा मृत्यू घातपातामुळे झाला असावा, संशय व्यक्त करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे राज्य सरकारला या अपघाताची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. दरम्यान, मुंबईतील मंत्रालयात दुपारी 4 वाजता होणारी बैठक दुपारी 12 वाजता होणार असल्याचा फोन आल्याने मेटे यांना तातडीने रात्रीच बीडहून मुंबईला निघावे लागले होते, असा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे.

 

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना शनिवारी मंत्रालयातून दोनदा फोन आला. सुरुवातीला रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. सायंकाळी सात वाजता त्यांना फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक 12 वाजता होणार आहे, असे सांगण्यात आल्याचे दिलीप पाटील यांनी म्हटले आहे. ही वेळ कुणी बदलली याचा शोध आता घेतला जात आहे. (Vinayak Mete Accident)

 

पाटील यांनी सांगितले की, मेटे यांना दोन्ही फोन आले तेव्हा त्यांनी मी बीडमध्ये आहे इतक्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे पलिकडील व्यक्तीला सांगितले.
त्यांच्यावर मुंबईला तातडीने येण्यासाठी दबाव कोणी टाकला,
याची चौकशी झाली पाहिजे असे पाटील यांनी म्हटल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

बैठक दुपारी 4 वाजताची होती, तीच वेळ कायम ठेवली असती तर मेटे सकाळी निघून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले असते.
दुपारी 12 ची वेळ ठेवल्याने मेटे यांना रात्रीच मुंबईला निघावे लागले आणि त्यांचा कारचा अपघात झाला.
ही वेळ कोणी बदलली, असा सवाल पाटील यांनी विचारला आहे.

 

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शंका व्यक्त करत म्हटले की, शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते,
तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी.

 

Web Title : – Vinayak Mete Accident | vinayak mete accident who changed the meeting time 12 pm instead of 4 pm the maratha leader dilip patil and shivsena expressed doubt

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा