Dhaagasutra | कस्टमाईज क्लोथिंगचा युनिक अनुभव देणारे ‘धागासूत्र’ पुणेकरांच्या सेवेत रुजू

संजीत पटवा आणि राज बोकारिया यांच्या अनोख्या 'धागासूत्र' या 'स्टार्टअप'चे उत्साहात लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune News | कपड्यांची खरेदी करत असताना ग्राहक अनेक गोष्टी पडताळून बघत असतात. कपड्याच्या उत्तम क्वालिटी सोबत हव्या तश्या डिझाईन्स ग्राहकांना मिळतीलच याची गॅरंटी नसते. ही उणीव आता पुणेकरांना भासणार नाही कारण ,जेंट्स, लेडीज आणि किड्स वेअर ची खरेदी मनपसंत डिझाईन्ससह शर्टींंग, सुटींग्, डिजायनर, ट्रॅडिशनल, एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर अशा वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद ग्राहकांना ‘धागासूत्र’च्या (Dhaagasutra) कस्टमाईज क्लोथिंग शोरूम मध्ये घेता येणार आहे. संजीत पटवा (Sanjit Patwa) आणि राज बकोरिया (Raj Bakoria) यांच्या अनोख्या ‘धागासूत्र’ (Dhaagasutra) या ‘स्टार्टअप’ चे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

Dhaagasutra | Join the service of 'Dhagasutra' Punekar, which gives a unique experience of customized clothing

 

याप्रसंगी अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar), अभिनेत्री सई मांजरेकर (sai manjrekar), अभिनेत्री सोनल चव्हाण (actress sonal chauhan) आणि अभिनेते रणविजय सिंह
(rannvijay singha) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘धागासूत्र’ (Dhaagasutra) हे शोरूम पुण्यात सेव्हन लव्ह चौक येथे सुरू झाले आहे.

 

Dhaagasutra | Join the service of 'Dhagasutra' Punekar, which gives a unique experience of customized clothing

 

‘धागासूत्र’ बद्दल माहिती देताना संजीत पटवा म्हणाले की, ‘धागासुत्र'(Dhaagasutra) हा एक स्टार्टअप आहे, राज बोकारिया आणि मी याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने केली आहे.
आता आम्ही हे पहिले शोरूम पुण्यात सुरू केलं आहे.
सामान्य ग्राहक जर आपल्या मागणी नुसार कॉशुम डिजाईन करून घेत असेल तर ते खूप महाग पडतात.
अन् दुकानातील रेडीमेड कपडे घ्यायचे म्हटंले की जसे आहेत तसेच घ्यावे लागतात त्यात आपल्याला काही सुधारणा करता येत नाही.
ग्राहकांची ही अडचण ‘धागासूत्र’ मूळे दूर होणार आहे. आमच्याकडे ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार डिझाईन, एम्ब्रॉयडरी, पेंटिंग करून शर्टींंग, सुटींग्, सूट,
शेरवानी, कुर्ता, लेडीज वेअर मध्ये ड्रेसेस, गाऊन, लॉन्ग ड्रेसेस, ट्रॅडिशनल, एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर खरेदी करता येणार आहेत.

 

पुढे बोलताना संजीत पटवा म्हणाले, ‘धागासूत्र’ (Dhaagasutra) हे एक एक्सपिरीयन्स स्टोअर आहे, इथे ग्राहकांना थेट खरेदीला येण्यासोबतच अपॉईंमेन्ट घेऊन येण्याची सुविधा आहे.
यामुळे त्या ग्राहकाला दोन ते अडीच तास आमचे डिझायनर वेळ देऊ शकणार आहेत.
या ठिकाणी ग्राहकांना अनुभवी कॉशुम डिजायनर कडून आपले कपडे डिझाईन करून मिळतील.
आमच्याकडे टर्कीश आणि इटालियन फॅब्रीक मध्ये सर्व व्हारायटी उपलब्ध आहेत.
ते ही एकदम वाजवी किंमतीत. ग्राहकांना त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर सात दिवसांच्या आत कपडे मिळणार आहेत.

 

कोविडच्या काळात आम्ही ऑनलाइन माध्यमातून 500 हून अधिक ग्राहकांना कस्टमाईज क्लोथिंगची सेवा पुरवली आहे.
आता त्या पुढे जात ही आमची पहिली शोरूम पुण्यात ओपन करताना आनंद होत आहे. हे आमचे पुण्यातील एकमेव शोरूम असणार आहे.
भविष्यात ‘धागासुत्र’चा अन्य शहरांमध्ये विस्तार करण्याची आमची योजना असल्याचे राज बकोरिया यांनी सांगितले.

Dhaagasutra | Join the service of 'Dhagasutra' Punekar, which gives a unique experience of customized clothing

 

Web Title : Dhaagasutra | Join the service of ‘Dhagasutra’ Punekar, which gives a unique experience of customized clothing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेसोबत जबरदस्तीने शरीर ‘संबंध’, ‘लगट’ केलेल्याचे व्हिडीओ FB व्दारे पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी

Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

High Court | पीडित महिलेचं चारित्र्य वाईट आहे असे म्हणून बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या सोडू शकत नाही : उच्च न्यायालय