Dhananjay Munde | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! किमान किती रूपये पीकविमा मिळणार?; कृषीमंत्र्यांनी दिले उत्तर

नागपूर : Dhananjay Munde | अवकाळी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) करण्यात आल्यानंतर याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांना किमान किती रक्कम दिली जाईल तो आकडा मुंडे यांनी सभागृहात सांगितला.

प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतची घोषणा करताना धनंजय मुंडे म्हणाले, राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्या अंतर्गत विविध रकमेचा विमा देण्यात आला आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याला कमीत कमी एक हजार रूपयाचा विमा नक्की मिळेल.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या. त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजार पेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीकविमा दिला जाईल.

पीकविमाबाबत माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, २४ जिल्ह्यात खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना
(Pradhan Mantri Crop Insurance Scheme) अंतर्गत ५२ लाख शेतकऱ्यांना अंदाजे २२१६ कोटी रुपये इतका
अग्रीम पीकविमा २५% प्रमाणे मंजूर करण्यात आला. त्यापैकी आज सकाळपर्यंत १६९० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले.
६३४ कोटी रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे. काही विमा कंपन्यांचे अपील सुनावणी स्तरावर असून ते निकाली
निघाल्यानंतर मंजूर पिकविम्याच्या रक्कमेत आणखी वाढ होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | साहू प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपावरही भ्रष्टाचाराचा आरोप, नाव घेतल्याने प्रसाद लाड संतापले

Uddhav Thackeray | दिशा सालियान प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा, ”…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”

BJP MLA Prasad Lad | काळापैशाचा आरोप केल्याने भाजपा आमदार प्रसाद लाड संतापले, संजय राऊतांना केली शिवीगाळ, म्हणाले…

CM Eknath Shinde | ”सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ”, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन