Dhananjay Munde | माझ्यासाठी ‘दिल्ली आणखी खूप दूर’, धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची अहमदनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी रविवारी बीडमध्ये राष्ट्रवादीची (Beed NCP) बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, पक्षाला मानणारे नागरिक यांनी पवार यांच्या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले. या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मार्गदर्शन केले.

 

नगरमध्ये होत असलेल्या शरद पवार यांच्या सभेला जिल्ह्यातून हजारो लोकांनी सहभागी व्हावे, याचे नियोजन करण्यासाठी पूर्व आढावा बैठकीचे आयोजन बीड राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke), आमदार बाळासाहेब आजबे (MLA Balasaheb Ajabe), आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar), माजी आमदार अमरसिंह पंडित (Ex-MLA Amar Singh Pandit), माजी आमदार उषा दराडे (Ex-MLA Usha Darade), माजी आमदार संजय दौंड (Ex-MLA Sanjay Daund), विजयसिह पंडित (Vijaysih Pandit), पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अहमदनगर येथील सभेबाबत माहिती दिली. त्यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी धनंजय मुंडे यांना लोकसभेच्या (Lok Sabha Elections) संभाव्य उमेदवारांच्या एका व्हायरल यादीचा संदर्भ देत तुम्ही लोकसभा लढणार का? असा प्रश्न विचारला. यावर धनंजय मुंडे यांनी आपल्यासाठी दिल्ली आणखी खूप दूर आहे, असे सांगितले.

 

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, माझी माझ्या पक्षाला एक कार्यकर्ता म्हणून राज्यात अधिक गरज आहे.
त्यामुळे पक्ष मला लोकसभा लढायला लावणार नाही. बीड लोकसभेत राष्ट्रवादीच्या उमेदावराने विजयी व्हावे,
हे आमचे लक्ष्य आहे. हे निश्चितच सत्य आहे. मात्र, मी स्वत: उमेदवार असेल, ही चर्चा चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :  Dhananjay Munde | dhananjay munde for me delhi abhi door hai
dhananjay mundes explanation on viral loksabha list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा