Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt | राज्य मंत्रिमंडळात नाराजीनाट्य, धनंजय मुंडेंचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘म्हणूनच अद्याप…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt | मंत्रीमंळ विस्तार होऊन अनेक दिवस झाले तरीही अजून पालकमंत्री निवडले नाहीत. कारण नवीन सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत. म्हणून त्यांनी अद्याप मंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलेली नाहीत. पाहिजे असलेले खाते न मिळाल्याने नाराज आहेत, असं हे अजब सरकार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला. (Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt)

 

धनंजय मुंडे म्हणाले, 20 जून रोजी महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मतदान संपल्यानंतर काही आमदार सुरतला गेले. त्यानंतर आणखी काही आमदार पुन्हा सुरतला गेले. तेथून त्यांनी गुवाहाटी, गोवा आणि मुंबई असा प्रवास केला. यासाठी त्यांचे 25 दिवस गेले. 27 दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक दिवस दोघांनीच सरकार चालवल्यानंतर 42 दिवसांनी मंत्रीमंडळ विस्तार झाला. पण अजून महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले नाहीत. (Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt)

शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावताना धनंजय मुंडे पुढे म्हणाले, मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल आणि अद्याप पालकमंत्री मिळाले नसतील तर तुमचा-आमचा विकास येणार्‍या किती दिवसात होईल याचा हिशोब लावा. शुन्याची ज्यांनी निर्मिती केली त्यांनाही हिशोब लावता येणार नाही.

 

ते पुढे म्हणाले, एखाद्या राज्यात सत्तांतर का होते? जनतेचे प्रश्न सुटत नव्हते का? जनतेला महाविकास आघाडी सरकारची फार मोठी अडचण झाली होती,
म्हणून हे नवीन सरकार आले आहे का? असे काहीही झाले नाही. ज्यांनी सरकार स्थापन केले आहे,
त्यांनाही कळेना, जे मंत्री झाले आहेत, त्यांनाही कळेना की नवीन सरकार अस्तित्वात का आले आहे.
जे मंत्री सुरतेकडे गेले, ते परत आल्यावर त्यांना कळले, आता आपले मंत्रीपदही गेले आहे,
ते आता मोकळे फिरत आहेत.

 

Web Title :- Dhananjay Munde On Shinde-Fadnavis Govt | ncp leader dhananjay munde speech in ncp melava beed why minister not taken charge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)