IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

0
1272
IPL-2023 | bcci made a big change in the rules and team will now go on the field with 15 players in t 20 matches
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL-2023) आता नवीन नियम पाहायला मिळू शकतो. कारण बीसीसीआयने (BCCI) ट्वेन्टी -20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. या नियमांनुसार आता आयपीएलमधील (IPL-2023) प्रत्येक संघ 11 नाही तर 15 खेळाडूंचा असणार आहे. प्रत्येक संघ आता 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरवणार आहेत.

 

सध्या घडीला स्थानिक क्रिकेटमध्ये हे बदल पाहायला मिळतील आणि आयपीएल (IPL-2023) सुरु होईपर्यंत हे नियम चाहत्यांना पूर्णपणे समजले असेल. त्यानंतर हे नवीन नियम (New Rules) आयपीएलमध्येही पाहायला मिळू शकते. बीसीसीआय पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या देशांतर्गत ट्वेंन्टी-20 स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) नवा प्रयोग करणार आहे. या स्पर्धेतून नवा नियम लागू केला जाणार आहे. जर हा नियम देशांतर्गत स्पर्धेत यशस्वी झाला, तर IPL-2023 मध्ये याची अंमलबजावणी होऊ शकते. या नव्या नियमांनुसार सामना सुरु असताना संघातील खेळाडू बदलला जाऊ शकतो.

 

बीसीसीआय या नव्या नियमाबाबत गंभीर असून त्यांनी सर्व क्रिकेट बोर्डांना यासंदर्भात परिपत्रक पाठवले आहे. यामध्ये म्हटले की, ज्या गतीने ट्वेन्टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत आहे, ते पाहता या खेळात काही नवीन गोष्टी आणणे आवश्यक आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये नवीन गोष्टी आल्याने ते अधिक आकर्षक होईल.

या नवीन नियमांनुसार…
इम्पॅक्ट प्लेअरच्या नव्या नियमांनुसार (Impact Player New Rules) सामान्यात अतिरिक्त खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान संघांना त्यांच्या रणनितीमध्ये बदल करुन परिस्थितीनुसार योजना तयार करता येणार आहे. या नवीन नियमानुसार, जेव्हा नाणेफेक होईल, तेव्हा त्यादरम्यान दोन्ही संघांना त्यांच्या प्लेइंग इलेव्हनला तसेच चार पर्यायी खेळाडूंचा पर्याय सांगावा लागेल.
त्यापैकी केवळ एक खेळाडू प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळवला जाऊ शकतो.
जरी संघ त्याच्या प्रभावशाली खेळाडूचा वापर करतो की नाही हे आवश्यक नाही.

 

तर प्रभावशाली खेळाडू परत येणार नाही
कोणत्याही डावाच्या 14 वे षटके पूर्ण होण्यापूर्वी कधीही प्रभाव पाडणारा खेळाडू वापरला जाऊ शकतो.
तसेच जर एखादा प्रभावशाली खेळाडूने संघात जागा घेतली तर तो संपूर्ण सामन्यातून बाहेर जाईल
आणि कोणत्याही परिस्थितीत परत येऊ शकणार नाही.
हे पहिल्यांदाच एखाद्या गेममध्ये लागू केले जात आहे. असे नाही.
क्रिकेट पूर्वी, फुटबॉल, रग्बी यासारख्या खेळांमध्ये प्रभावशाली खेळाडूंचा नियम आहे. यामध्ये संघ केवळ सामन्यादरम्यानच खेळाडू बदलू शकतो.

 

Web Title :- IPL-2023 | bcci made a big change in the rules and team will now go on the field with 15 players in t 20 matches

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rajesh Shah | ‘भारतीय उद्योग व्यापार मंडळ’ या देश पातळीवरील संस्थेच्या ‘राष्ट्रीय सहमंत्री’ पदावर राजेश शहा यांची निवड

Shivsena Dasara Melava 2022 | दसरा मेळावा शिवतीर्थावरच! उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आदेश, म्हणाले…

Homemade Hair Mask | तुम्ही सुद्धा गळणार्‍या, कोरड्या आणि पांढर्‍या केसांनी त्रस्त आहात का? मग घरी बनवा ‘हे’ 5 हेअर मास्क