‘या’ मागण्यांसाठी धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे. तसेच मेगा भरती आरक्षण मिळेपर्यंत करु नये व सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नामांतर करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी दोंडाईचा धनगर समाजाचे संजय लांडगे, जयवंत बोरसे, शैलेश बोरसे, नरेंद्र बाविस्कर, नीलेश बाविस्कर, टायगर धनगर, अविनाश धनगर, ओमदीप धनगर, योगेश धनगर आदी उपस्थित होते.

सकल चर्मकार महासंघाची तेल्हारा कार्यकारिणी जाहीर
अकोला : सकल चर्मकार महासंघ महाराष्ट् राज्य तेल्हारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात साई नगर येथील सामाजिक सभागृहात सहविचार सभा झाला. यात चर्मकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी संजय मस्तुद, तालुका सचिव महादेव सोनटक्के, शहराध्यक्ष संजय टाले, कार्याध्यक्ष पवन कामटे, सचिव प्रा. सचिन गव्हाळे, तेल्हारा शहर युवा कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून राजेश गणगे, सचिव कमलेश बायाळ, कार्याध्यक्ष दीपक खरतडे यांची निवड करण्यात आली.

राज्य अध्यक्ष गजानन डामरे आणि मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी जगदेवराव गव्हाळे व अतिथी म्हणून विश्वनाथ डांगे, घोपे होते. प्रास्ताविक गजानन रेवस्कर, संचालन माठे, तर आभार सचिन गव्हाळे यांनी मानले.

कार्यक्रमाला सकल चर्मकार संघाचे राज्य कार्यकरिणी अध्यक्ष गजानन डामरे, जिल्हाध्यक्ष राजकुमार नाचणे, जिल्हा सचिव मुरलीधर भटकर, महिला आघाडी अध्यक्ष लिना चिम, महिला आघाडीच्या विदर्भ प्रमुख मीना बुंदीले, पुंडलिकराव गव्हाळे, शेंगोकर, घोपे, पदमने, किशोर वाडेकर, कमलेश बायाळ, दीपक खरतडे, सिसोदिया, संतोष पानझाडे, ज्ञानेश्वर माठे, संतोष पिंजरकर, शेषराव इंगळे, गणेश पानझाडे, महादेव सोनटक्के, गिरीश रोजतकार, विनोद रोजतकार, मोहन खेडकर यांच्यासह तेल्हारा तालुक्यातील चर्मकार बांधव उपस्थित होते.