Dhirendra Krishna Shastri | धीरेंद्रशास्त्रींच्या जातिवाचक वक्तव्याने बसोर समाज संतप्त, म्हणाले – ‘तू ब्राह्मण आहेस मग मी काय…’ (Video)

सीकर : Dhirendra Krishna Shastri | बागेश्वर धामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी एका मागास जातीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने संताप व्यक्त होत आहे. धीरेंद्रशास्त्री यांच्या वक्तव्यामुळे बसोर समाजाचा अपमान झाल्याचे या समुदायाने म्हटले आहे. या प्रकारानंतर बसोर समाजाने अनुसूचित जाती आणि जनजाती अधिनियमांतर्गत पोलिस तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (Dhirendra Krishna Shastri)

धीरेंद्रशास्त्री यांच्याविरोधात कारवाई करा, अन्यथा बौद्ध धर्म स्वीकारू असा इशारा बसोर समाजाने दिला आहे. २ सप्टेंबरला राजस्थानमधील सीकरमध्ये धीरेंद्रशास्त्री यांनी हे वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छतरपूरच्या बसोर समाजाने पोलीस ठाण्यात धीरेंद्रशास्त्रींच्या विरोधात तक्रार नोंदवली. (Dhirendra Krishna Shastri)

आपल्या दरबारात बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री एका युवकासोबत बोलत होते. बाबा बागेश्वर यांनी काढलेल्या एका चिठ्ठीवर या युवकाने आक्षेप घेतल्यावर बाबा बागेश्वर संतापले. त्यांनी युवकाला आव्हान दिले. यानंतर तो युवक म्हणाला, मी ब्राह्मण आहे. यावर धीरेंद्रशास्त्री म्हणाले, मग मी काय बसोर आहे का? यानंतर युवक आणि बाबा यांच्यात बराच वाद झाला.

https://x.com/OmnarayanDhanuk/status/1700405999373623332?s=20

धीरेंद्रशास्त्री यांच्या या वक्तव्याचे संतप्त पडसाद आता ठिकठिकाणच्या बसोर समाजात उमटू लागले आहेत. बागेश्वर बाबाने आमच्या समाजाचा अपमान केला आहे. धीरेंद्रशास्त्रींविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर देशभरात आंदोलन करू आणि बसोर समाज सोडून बौद्ध धर्म स्वीकारू असा इशारा या समाजाने दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | “आपण बोलून मोकळं व्हायचं”; राज्य सरकारच्या व्हायरल व्हिडिओवरुन
ओमराजे निंबाळकर आणि रोहित पवारांचा हल्लाबोल (Video)

Pune Crime News | नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून मोबाइल चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड,
4 लाखांचा मुद्देमाल जप्त

Manoj Jarange Patil | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या जालना भेटीबाबत मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया,
म्हणाले…

RSS Meeting In Pune | संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा