चित्रपटगृहात अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्यांना अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट बघण्याच्या नावाखाली चित्रपटगृहात अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्यांना दामिनी पथकाने छापा टाकून अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये १० युवक युवतींचा समावेश आहे. ही कारवाई दामिनी पथकाने धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात केली. दामिनी पथकाने अचानक केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

शहरातील चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघण्याच्या नावाखाली जोडपी अश्लिल चाळे करत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली होती. शहरातील काही चित्रपटगृहमध्ये दोनशे रुपये प्रतितास बसण्यासाठी जोडप्यांकडून घेतले जात असून त्यांना बसण्यासाठी विशिष्ट जागा दिली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे दामिनी पथकाने साध्या वेषात पथकातील एक महिला आणि पुरुषाला चित्रपगृहात नकली जोडपे बनवून पाठवण्यात आले. चित्रपटगृहात गेलेल्या जोडप्याने माहितीची खातरजमा केली असता चित्रपटगृहातील बॉक्समध्ये काही जोडपी अश्लिल चाळे करताना आढळून आली. याची माहिती दामिनी पथकला दिल्यानंतर पोलिसांनी चित्रपटगृहात छापा टाकला. ही कारवाई सुरु असताना १६ पैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे तर ६ आरोपी गर्दीचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार