धुळे : निमडाळे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – निमडाळे येथील आश्रम शाळेतील विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर माहिती अशी की, निमडाळे गावातील आनंद मुलींचे बालगृहात राहणारी विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.विद्यार्थीनी आज शाळेला सुट्टी असल्यामुळे नेहमी प्रमाणे दैनदिनीत गुंतलेली होती.सायकाळी मैदानात खेळण्यासाठी अन्य मुलींनी तिला बोलविले तीने त्यांना सांगितले की, मला अभ्यास करायचा आहे.मी खेळायला येणार नाही.असे सांगुन ती खोलीत गेली खोलीत गेल्यावर तिने चांगले कपडे परिधान केले.चांगली तयारी केली.कुठेतरी बाहेर जायचे या तय्यारीने परंतु ती खोली बाहेर न येता तिने आश्रम शाळेतील खोलीत छताला ओढणी बाधुंन गळफास लावून घेतला

कोणालाच काही समजले नाही.काही वेळाने ताई खोलीतून बाहेर आली नाही.काय करते पाहण्यासाठी अन्य विद्यार्थींनी खोली जवळ आल्या त्यांनी तिला आवाज दिला.परंतू काही आवाज न आल्याने त्या ही घाबरल्या त्यांनी आरडाओरड केली.याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली.पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत.आश्रम शाळेतील त्या खोली जवळ पोहचले.झरोक्यातून डोकावून पाहिले असता छताला लटकलेली विद्यार्थीनी दिसली.तातडीने दारला धक्के मारुन ते दार तोडुन उडण्यात आले.त्यावेळी छताला गळफास लावून घेतलेली विद्यार्थीनी दिसली.पोलीसांनी नातेवाईक,व्यस्थापनातील नागरीकांच्या मदतीने मुलीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

मुलीच्या आई व वडीलांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही.पश्चिम देवपूर पोलीस पुढील तपास करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/