Dia Mirza | अभिनेत्री दिया मिर्झाची सावत्र लेक पापाराझींना पाहून लपवू लागली चेहरा; व्हिडिओ होतोय व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी दिया ही एकेकाळी लाखो लोकांची क्रश बनली होती. अभिनेत्री दिया मिर्झा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दियाचा चाहता वर्ग मोठा असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामुळे पापाराझी देखील दियाची झलक कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचे प्रयत्न करत असतात. मात्र यावेळी अभिनेत्री दिया मिर्झासोबत तिची सावत्र मुलगी समायरा रेखी (Samaira Rekhi) देखील होती. पापाराझी आणि कॅमेऱ्याला पाहून तिची लेक घाबरते आणि चेहरा लपवू लागते. अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) व तिच्या लेकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Dia Mirza Viral Video) होत आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना पापाराझी तिचे फोटो घेण्यासाठी उत्सुक असतात. मात्र यावेळी तिच्या सोबत तिची सावत्र लेक (Dia Mirza Step Daughter) देखील होती. एवढ्या लोकांना व कॅमेऱ्याला बघून ती घाबरते. त्यांची ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडियोमध्ये पापाराझींना पाहताच तिची सावत्र लेक म्हणजे समायरा रेखी घाबरते आणि त्यानंतर तिचा चेहरा लपवते. सुरुवातीला समायरा दियाच्या मागे तिचा चेहरा लपवते आणि त्यानंतर तिचे केस चेहऱ्यासमोर घेऊन चेहरा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसते. यावर दिया मिर्झा बोलते की ‘तिला घाबरवू नका, तिला फोटो काढायला आवडत नाही.’ दियाने असे सांगताच पापाराझींनी फोटो काढणे थांबवले आणि तिची मुलगी गाडीमध्ये बसल्यानंतर फक्त अभिनेत्री दिया मिर्झाचे फोटो काढले.

अभिनेत्री दिया मिर्झा ही सोशल मीडियावर देखील सक्रीय आहे. अनेकदा ती तिचे फोटो (Dia Mirza) व लाईफ अपडेट शेअर करताना दिसते. मात्र सोशल मीडियावरील फोटोमध्ये देखील दिया तिच्या सावत्र मुलीचा चेहरा झाकत आहे. याउलट अभिनेत्री दिया ही तिच्या मुलाचे म्हणजेच अव्यानचे फोटो बिंधास्त सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा मुलगा अव्यान आझाद रेखी (Avyan Azad Rekhi) हा फोटोफ्रेंडली असल्याचे दिसून येते. अभिनेत्री दिया मिर्झा हिने वैभव रेखी सोबत दुसऱ्यांदा लग्न केले. वैभव याचे देखील आधी एक लग्न झाले होते. समायरा रेखी ही वैभव रेखी यांच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिने तिच्या सौंदर्याने व अभिनयाने बॉलीवुडचा एक काळ गाजवला होता. तिने 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘रहना है तेरे दिल में’ (Rehnaa Hai Terre Dil Mein) या चित्रपटातून दमदार पदार्पण केले होते. पहिल्यांच चित्रपटामध्ये अभिनेत्री दियाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यामधील दिया मिर्झा आणि अभिनेता आर माधवन (R. Madhavan) यांची जोडी जबरदस्त गाजली होती. त्यानंतर दियाने तुमसा नहीं देखा (Tumsa Nahin Dekha), नाम गुम जायेगा (Naam Gum Jaayega), तुमको ना भूल पायेंगे (Tumko Na Bhool Paayenge), भीड (Bheed),थप्पड (Thappad) आणि संजू (Sanju) अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी