Diabetes Diet | कच्च्या भाज्या खाऊन दूर होऊ शकते का डायबिटीजची समस्या, जाणून घ्या किती परिणामकारक आहे ‘हे’ खाणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | डायबिटीज (Diabetes) साठी अनेक डाएट प्लान आहेत, त्यापैकी एक कच्चा आहार आहे. कच्चा आहार म्हणजे यात केवळ कच्च्या गोष्टींचा (Raw Diet) समावेश केला जातो. एका प्रसारित माहितीपटानुसार, कच्च्या भाज्यांनी (Raw Vegetables) डायबिटीज दूर केला जाऊ शकतो. हा दावा कितपत खरा आहे आणि ते खरोखर शक्य आहे की नाही ते जाणून घेवूया… (Diabetes Diet)

 

डायबिटीजसाठी कच्च्या भाज्यांचा आहार (Raw Vegetables Diet For Diabetes)
कच्च्या भाज्यांच्या आहाराबद्दल बोलायचे तर, त्यात फक्त कच्च्या भाज्या आणि इतर कच्चे पदार्थ समाविष्ट केले जातात. डॉक्युमेंट्रीमधील व्यक्ती म्हणते की, अनेक लोकांनी हा कच्च्या भाज्यांचा आहार घेतला आणि एक महिन्यानंतर, त्यांच्या इन्सुलिनची पातळी कमी झाल्याचा परिणाम त्यांना दिसला.

 

पण, हा आहार खरंच मधुमेहासाठी तितका प्रभावी आहे का? खरं तर, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आहारात कच्च्या अन्नाचा समावेश केल्याने आरोग्यामध्ये बदल दिसून येतात, तसेच कच्च्या भाज्यांचे सेवन डायबिटीजच्या व्यवस्थापनात प्रभावी परिणाम दर्शवते. कारण कच्च्या भाज्यांमध्ये नॉन अ‍ॅक्टिव्हेटेड एन्झाईम्स असतात. या एन्झाईम्सचे अनेक फायदे शरीरावर दिसून आले आहेत. पण, जेवण शिजवताना ते जास्त प्रमाणात कमी होते.

 

याशिवाय कच्च्या खाद्यपदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. कच्च्या जेवणात फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे एनर्जी रिलिज करतात तसेच शुगर स्टेबल करतात. ते जंक फूडसारखे अ‍ॅडिक्टिव्ह देखील नाहीत, म्हणून ते मर्यादित आणि आवश्यक प्रमाणात सेवन केले जाऊ शकतात.

 

मात्र, कच्च्या भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट धुवाव्यात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे किटाणू तुमच्या पोटात जाणार नाहीत.
तसेच डायबिटीजने ग्रस्त व्यक्तीने कोणताही आहार घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | is it possible to reverse diabetes with raw food diet read to know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pre-Diabetes Diet | डायबिटीजचा धोका वाटतोय का? बचावासाठी खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरची जोखीम वाढवतात रात्री केलेल्या ‘या’ चूका, अवयव होऊ शकतात खराब !

 

Yakub Memon Grave | याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरणावरून वाद