Diabetes Symptoms | कमी वयात डायबिटीज झाल्यास दिसतात अशी लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

नवी दिल्ली : Diabetes Symptoms | भारतात डायबिटीजचे रूग्ण सर्वाधिक आहेत. पूर्वी हा आजार वृद्धांना होत होता, मात्र आता लहान मुले आणि तरुणही त्याला बळी पडत आहेत. तरुण वयातील बहुतेक लोकांना टाइप २ डायबिटीजचा जास्त धोका असतो (Diabetes Symptoms). डायबिटीज सुरू होण्‍यापूर्वी काही लक्षणे दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे कोणती ते जाणून घेऊया (Diabetes At Young Age).

डायबिटीजची ५ सुरुवातीची लक्षणे

सतत संसर्ग होणे

सतत संसर्ग होणे हे मधुमेहाचे आणखी एक प्रारंभिक लक्षण असू शकते. ब्लड शुगर वाढल्यामुळे इम्युन सिस्टम योग्यरित्या काम करू शकत नाही, ज्यामुळे वारंवार संसर्ग होऊ शकतो. किशोरावस्थेत शरीराच्या एखाद्या भागात वारंवार इन्फेक्शन होत असेल तर डायबिटीज असू शकतो. (Diabetes Symptoms)

जखम सावकाश भरणे

जखम बरी होण्यासाठी जास्त वेळ लागणे हे डायबिटीजचे लक्षण आहे. शुगर लेव्हल वाढते, तेव्हा इम्युन सिस्टम योग्यरित्या काम करत नाही, ज्यामुळे जखम बरी होण्यास जास्त वेळ लागतो.

थकवा आणि अशक्तपणा

जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा ते पुरेसे प्रमाणात वापरण्यास सक्षम नसते तेव्हा तीव्र थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. किशोरावस्थेत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे हे डायबिटीज किंवा इतर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.

जास्त भूक लागणे

डायबिटीजचे आणखी एक लक्षण म्हणजे जास्त भूक. लहान वयात जास्त भूक लागणे हे सामान्य आहे,
परंतु जर इतर लक्षणांसह जास्त भूक लागत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

जास्त तहान लागणे

सारखी तहान लागत असल्यास सावध व्हा. डायबिटीजच्या रुग्णांना जास्त तहान लागते. अशावेळी ब्लड शुगर तपासणी करा.
मात्र, तहान लागणे हे केवळ डायबिटीजचे लक्षण नाही, परंतु खात्री करण्यासाठी, चाचणी करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mosquito Borne Diseases | मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियामध्ये काय आहे फरक? समजून घेतले तर होईल फायदा