दिघीतील बेपत्ता युवकाचा खून; दाेनजण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा आज मृतदेह आढळून आल्याने दिघी परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचा मृतदेह आज (शुक्रवार) दिघी येथील डोंगरात आढळून आला आहे. तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह डोंगरात फेकून दिला होता.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’539cdb05-a79e-11e8-b36c-01ee29acee61′]

महंमद अलम अन्सारी (वय-२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जबीन अंसारी अाणि संतोष जाधव या दाेघांना अटक करण्यात आली आहे.दिघी पोलीस ठाण्यात खूनचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

महंमद अन्साही हा ८ ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिघी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, आज त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली. नालासाेपारा येथे झालेल्या वादातून हा खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दत्तनगर येथील डाेंगरात फेकुन दिला.  दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.