Dighi Pimpri Crime | दिघी मध्ये एअर पिस्टल, कोयता, चाकू जप्त, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Dighi Pimpri Crime | दिघी पोलिसांनी माधवनगर (Madhav Nagar Dighi) परिसरातून एका व्यक्तीला अटक करुन त्याच्याकडून एअर पिस्टल, कोयता व चाकू अशी हत्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.17) सकाळी आठच्या सुमारास माधवनगर येथील गल्ली नं.4 येथे करण्यात आली आहे.

संतोष धनाजी गोंदके (वय-38 रा. माधवनगर, दिघी) याच्यावर आयपीसी 379 आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई वैभव गोरख काकडे (वय-32) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगर येथे एकजण बेकायदेशीर शस्त्र बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चाकू, कोयता, सिस्को एअर पिस्टल असा एकूण 13 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीने सिस्को एअर पिस्टल भोसरी एमआयडीसी येथून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चऱ्होली परिसरातून गांजा जप्त

दिघी : विक्रीसाठी बेकायदेशीर गांजा (Ganja) बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pimpri) अटक केली आहे. त्याच्याकडून 20 किलो 13 ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईल असा एकूण 1 लाख 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चऱ्होली-धानोरी रोडवरील (Charholi Dhanori Road) पठारे माळा (Pathare Mala) येथे मंगळवारी (दि.16) रात्री दहाच्या सुमारास केली.

विकी उर्फ विकास आकाश घोडके (वय-29 रा. प्रायव्हेट रोड, पुणे स्टेशन, पुणे)
याच्यावर एन.डी.पी.एस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलीस हवालदार विजय रंगनाथ नलगे (वय-33) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर अजय ससाणे (रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याचा पोलीस शोध घेत आहेत.

खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी दिघी परिसरात पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी पिरसाहेब महाराज मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला एकजण गांजा विक्री करण्यासाठी थांबला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून विकी घोडके याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा सापडला.
गांजा बाबत चौकशी केली असता अजय ससाणे याच्याकडून आणल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात