Digital Transactions | ‘मागील 7 वर्षात भारतात 19 पट वाढले डिजिटल व्यवहार’ – PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : Digital Transactions | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी देशभरात Unified Payments Interface (UPI) सुविधांचे कौतूक करत म्हटले की, मागील सात वर्षात भारतात डिजिटल व्यवहार 19 पट वाढले आहेत. अतिशय कमी काळात भारत डिजिटल व्यवहाराच्या (Digital Transactions) बाबतीत जगातील आघाडीचा देश बनला आहे.

 

केवळ 7 वर्षात भारतात डिजिटल व्यवहार (Digital Transactions) 19 पट वाढले आहेत. आज आपली बँकिंग प्रणाली 24 तास, 7 दिवस आणि 12 महिन्यात कधीही आणि केव्हाही चालू आहे. पंतप्रधान शुक्रवारी RBI ने लाँच केलेल्या ग्राहक केंद्रित उपक्रमाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

पंतप्रधान म्हणाले, काही वर्षांपूर्वी बँकिंग, विमा आणि पेन्शनसारख्या सुविधांचा लाभ देशातील काही विशेष आणि कमी लोकच घेऊ शकत होते. देशातील सामान्य नागरिक, गरीब कुटुंब, शेतकरी, छोटे व्यापारी-व्यवसायी, महिला, दलित, वंचित आणि मागासवर्गासाठी या सुविधा मिळत नव्हत्या.

 

सोबतच बँकिंग क्षेत्रात सुद्धा शाखांची कमतरता, कर्मचार्‍यांची कमतरता आणि इंटरनेट कनेक्शन सारख्या अनेक कमतरता होत्या. गरीब आणि सामान्य लोकांना मिळणार्‍या सुविधांवर यापूर्वी लक्ष दिले गेले नाही.

 

पंतप्रधानांनी यावेळी बँकिंग सुविधा सुधारण्यात सहकारी बँकांच्या भूमिकेचे सुद्धा कौतूक केले.
मोदी म्हणाले, बँकिंग क्षेत्र आणखी मजबूत करण्यासाठी सहकारी बँकांसुद्धा आरबीआयच्या कक्षेत आणल्या.
यामुळे या बँकांच्या शासनात सुधारणा होत आहे आणि लाखो ग्राहकांचा विश्वास सुद्धा मजबूत होत आहे. (Digital Transactions)

 

शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी आरबीआयच्या कस्टमर सेंट्रिक उपक्रमांतर्गत (Customer Centric Initiative)
के अंतर्गत सुरू केलेल्या दोन योजना लाँच केल्या.
व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची Retail Direct scheme
आणि Integrated Ombudsman scheme सुरू झाल्याची घोषणा केली.

 

Web Title :- Digital Transactions | digital transactions in india increased 19 times during last seven years pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा