Dilip Walse Patil | ‘…म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी अनेक रंजक प्रसंग सांगितला आहे. महत्वाचे म्हणजे वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत असणारा कथित किस्सा सांगितला आहे. पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा शरद पवार यांच्याकडे मतदारसंघासाठी महाविद्यालय (College) असावे, अशी मागणी केली होती. पण, शरद पवार हसले आणि म्हणाले की, तुझ्या मतदारसंघात महाविद्यालयाची गरज नाही. तर साखर कारखान्याची (Sugar factory) गरज आहे. त्यामुळे साखर कारखान्यासाठीचा प्रस्ताव घेऊन ये, असे सांगितले. असं वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

 

पुढे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, पवार यांच्या सांगण्यानंतर आम्ही साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला आणि शरद पवार यांनी आमच्या मतदारसंघात साखर कारखाना मंजूर केला. फक्त 8 महिन्यात साखर कारखाना उभा केला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दूरदृष्टीने तो निर्णय घेतला होता. त्याचा आज सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. तो साखर कारखाना आताच्या घडीला आघाडीवर आहे.

 

मतदारसंघात डीएड कॉलेजची इच्छा त्यावेळी जरी राहिली, तरी त्यांनी डीएड नाही, पण बीएड कॉलेज मंजूर करून घेतले. आणि पुढे उच्च तंत्रशिक्षण मंत्री झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बीएड, डीएड कॉलेजेस मागितली, ती मंजूर करून दिली. दुसरीकडे, प्रसिद्धीसाठी कोणतेही काम करत नाही किंवा केलेल्या कामाचे श्रेय घेत नाही. श्रेयाची लढाई असली, तरी अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तम मदत केली. त्यामुळे श्रेय घेण्यापेक्षा यशस्वीरित्या काम पूर्ण करण्यावर अधिक भर राहिला. असं वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर आपल्याकडे संगणक साक्षरांची संख्या कमी होती.
त्यावेळी तज्ज्ञांसोबत बरीच चर्चा झाली. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला.
त्यातून महाराष्ट्र ज्ञान मंडळ म्हणजेच MKCL ची स्थापना करण्यात आली.
त्याअंतर्गत पाच हजार केंद्रे राज्यभर उभी केली. तसेच त्याकाळात सुमारे 20 हजार तरुणांना यातून रोजगार प्राप्त झाला. असं वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Dilip Walse Patil | maharashtra home minister dilip walse patil told why sharad pawar approved sugar factory constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Latur District Bank Election | भाजपला धक्का ! लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

Breast Cancer Symptoms | महिलांसाठी अलर्ट ! भारतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’ची प्रकरणे 50% वाढली, ‘या’ 7 लक्षणांवरून ओळखा; वेळेवर योग्य उपचारासाठी होईल मदत

Mutual Fund | ‘या’ फंडने दिला 64.8% चा शानदार रिटर्न ! 10 हजाराची गुंतवणूक झाली 1.57 कोटी रुपयांची, जाणून घ्या सविस्तर