‘त्या’ चित्रपटाची शुटिंग पूर्ण केल्यानंतर लगेचच दीपिकाने लिहिली ‘ही’ खास ‘पोस्ट’…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलीवूड मधील एक परिचित नाव आहे. तिने बॉलीवूडमध्येच नव्हे तर हॉलीवूडमध्ये देखील आपली खास ओळख बनवली आहे. दीपिका सध्या तिच्या आगामी ‘छपाक’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. परंतु अशी एक बातमी समोर आली आहे की दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाली आहे. दीपिकाने ऍसिड हल्ल्यातील लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ चित्रपटाची शुटिंग पूर्ण केली आहे.

या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे दीपिकाने सोशल मीडियावर लिहिले की,”माझ्या करियर मधील सर्वात उत्तम चित्रपटाची शुटिंग संपली आहे. ही पोस्ट करतांना तिने एक फोटो देखील शेयर केला आहे ज्यात कास्ट आणि क्रू मेंबर्स अविस्मरणीय मेम्बर्सला कैद करण्यासाठी पोज देत आहेत. चित्रपटाविषयी बोलायचं गेलं तर हा चित्रपट मेघना गुलजार दिग्दर्शित आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत विक्रांत मेसी आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.