Disabled Welfare Department Maharashtra | दिव्यांग कल्याण विभाग : मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता नागपुर, पुणे, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात 16 पुनर्वसनगृह होणार

पोलीसनामा ऑनलाइन – Disabled Welfare Department Maharashtra | मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता (Individuals Free Of Mental Illness) चार जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थामार्फत 16 पुनर्वसनगृह स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. (Disabled Welfare Department Maharashtra)

पहिल्या टप्प्यामध्ये नागपुर (Nagpur), पुणे (Pune), ठाणे (Thane) व रत्नागिरी (Ratnagiri) या ठिकाणी
ही पुनवर्सनगृह स्थापन करण्यात येतील. या पुनर्वसनगृहांमध्ये 18 ते 55 वयोगटातील तसेच 55 वर्षांवरील
वयोगटातील ज्येष्ठ अशा दोन्ही वयोगटातील पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे एकूण 16 पुनर्वसन गृहे
सुरु करण्यात येतील. या पुनर्वसन गृहांच्या खर्चापोटी पाच कोटी 76 लाख रुपयांच्या तरतुदीस देखील बैठकीत
मान्यता देण्यात आली. तसेच पुढील टप्यामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शिफारशीनुसार मानसिक आजारमुक्त व्यक्तींची संख्या वाढल्यास, ती विचारात घेऊन आवश्यकतेनुसार पुनर्वसन गृहांच्या संख्येत वेळोवेळी वाढ करण्याच्या तरतुदीसही मान्यता देण्यात आली. (Disabled Welfare Department Maharashtra)

मानसिक आजारमुक्त व्यक्तींना पुढील उपचाराची गरज नसते किंवा ज्या मानसिकमुक्त व्यक्ती बेघर आहेत
किंवा त्यांचे कुटुंबिय स्वीकारत नाहीत अशांसाठी ही पुनर्वसनगृहे असतील.
पुनर्वसनगृहाने प्रवेश देण्यात आलेल्या व्यक्तीस विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावयाचे आहे.
त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करणे, समुपदेशन करणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे, त्यांचा निवास, भोजन,
क्रीडा व मनोरंजन, स्वच्छता, संरक्षण आदी बाबींची जबाबदारी घ्यावयाची आहे.
पुनर्वसनगृह चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस 12 हजार रुपये प्रती व्यक्ती प्रती महिना सहायक अनुदान देण्यात येईल. अशा संस्थांची निवड करण्यासाठी राज्य स्तरावर निवड समिती असेल. (Maharashtra Cabinet Decision)

Web Title : Disabled Welfare Department Maharashtra | 16 rehabilitation homes will be established in Nagpur, Pune, Thane and Ratnagiri for Individuals Free Of Mental Illness

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajay Devgn And Kajol | घरात कोणाचं चालतं या प्रश्नावर अजय देवगणने दिले काजोल समोर ‘हे’ उत्तर

Palkhi Sohala 2023 | ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा शुभारंभ

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

Financial Literacy and Cyber ​​Security | आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी