अन्नविषबाधा म्हणजेच ‘फूड पॉईजनिंग’ म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ?

पोलीसनामा ऑनलाइन – अन्नविषबाधा ही दूषित अन्न आणि पाणी पिल्यानं होते. जीवाणुंमुळं किंवा लहान कीटकांमुळं अन्न दूषित होतं. असं अन्न खाल्ल्यानं त्रास होतो. शरीरातील विविध सिस्टीमवर याचा परिणाम होतो. परंतु पोट आणि आतंड्यावर याचा जास्त परिणाम दिसतो.

काय आहेत याची लक्षणं ?

– मळमळ
– उलट्या
– ताप
– कावीळ
– पोटात दुखणं
– भूक कमी होणं
– थंडी वाजणं
– चक्कर
– जास्तीचा घाम

काय आहेत याची कारणं ?

– कोणताही जीवाणू, विषाणू, किंवा परजीवी अन्न दूषित करू शकतो. असं दूषित अन्न खाल्ल्यानं.
– आरोग्यास हानिकारक जीवाणूंच्या वाढीची स्थिती, चुकीचे अन्न शिजवण्याची पद्धत, प्रोसेसिंग किंवा पॅकेजिंगमुळं अन्न दूषित होऊ शकतं.
– साल्मोनेला टायफी, व्हिबरो कॉलरा, क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल, स्टॅफिलोकॉकस ओरियस आणि कॅफिलोबॅक्टर या जीवाणुंमुळं अन्न दूषित होतं.
– रोटाव्हायरस आणि हेपेटायटीस ए विषाणूसुद्धा अन्नाला दूषित करतात.

काय आहेत यावरील उपचार ?

– ज्या लक्षणांमुळं बाधा झाली आहे ती लक्षणं कमी करणं
– शरीराताली विशेष जीवाणूला मारण्यासाठी अँटीबायोटीक्स दिल्या जातात. या अँटीबायोटीक्स या जीवाणूनुसार दिल्या जातात.
– शरीरातून जीवाणू पूर्णपणे नष्ट होण्यासाठी सांगितल्या प्रमाणे अँटीबायोटीक्सचा कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे.
– डिहायड्रेशनवर उपचार करण्यासाठी फ्लुइड रिप्लेसमेंट पद्धती आणि इलेक्ट्रोलाईट्स पद्धती वापरतात.
– तोंडावाटे द्रवाची पातळी भरून काढण्यासाठी भरपूर पाणी प्या. याशिवाय सरबत, ताजा फळांचा रस, नारळ पाणी, ताक पिणं आवश्यक आहे.