दिशा पाटनीचे SEXY फोटो पाहून तिच्या आई-वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या दिशा पाटनी चांगलीच चर्चेत आहे. याला कारण म्हणजे तिचा ग्लॅमरस लुक आणि तिने शेअर केलेले काही फोटो आहेत. एकामागोमाग एक फोटो टाकत ती सर्वांनाच घायाळ करत आहे. नुकतेच काही बोल्ड फोटो समोर आले आहेत जे व्हायरल झाले होते. अशातच आता या सगळ्यावर तिच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया आहे हे आता दिशाने एका मुलाखतीत सांगितले आहे. ही प्रतिक्रिया खूपच चकित करणारी आहे.

एका मुलाखतीत बोलताना दिशा म्हणते की, “माझं कुटुंब हे खूपच कूल माईंडेड आहे. परंतु पप्पा जेव्हा असे फोटो पाहतात तेव्हा ते जरा नाराज होतात. घरातले मला टीव्हीवर पाहत असतात आणि त्यांना माहीत असतं की, मी काही चुकीचं करत नाहीये. परंतु जेव्हा मी माझे फोटो व्हॉट्स अॅप ग्रुपवर पाठवते तेव्हा मात्र माझे पप्पा थोडे अस्वस्थ होतात.”

आपल्या आईच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना दिशा म्हणते की, “माझी आई इंस्टावर आहे. ती नेहमीच माझ्यावर लक्ष ठेवून असते. परंतु मी आता माझ्या आईला माझे फोटो आता पाठवत नाही.

दिशा एका अंडरगारमेंट कंपनीची ब्रँड अॅंम्बेसेडर आहे. तिच्या अनेक फोटोमुळे ती सोशलवर ट्रोल झाली आहे. लवकरच ती भारत या सिनेमात सलमान खान सोबत दिसणार आहे.