औरंगाबाद महापालिकेत ‘राडा’, MIMच्या नगरसेवकाकडून ‘राजदंड’ पळविण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत विजय मिळविलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून औरंगाबाद महानगरपालिकेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंडही पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी वाढत्या गदारोळामुळे एमआयएमच्या ५ नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्याला एक दिवसासाठी निलंबित केले आहे.

लोकसभा निवडणूकीनंतरची महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचा अभिनंदन ठराव आणि शहरातील पाणी प्रश्न यावरून आज सर्वसाधऱण सभेत गोंधळ झाला.

एमआयएमच्या सदस्यांनी प्रथम खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र भाजप सदस्यांनी पाणी प्रश्न महत्वाचा असल्याचे सांगत या प्रश्नावरून महापौरांच्या डायससमोर धाव घेतली. त्यानंतर भाजप सदस्यांनी महापौरांच्या डायससमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्याचवेळी भाडपच्या सदस्यांनी महापौरांच्या डायसवरील राजदंड पळविला मात्र तो अफसर खान यांनी परत आणून ठेवला. काही वेळातच एमआयएमचे नगरसेवक तेथे आले. त्यांनीही महापौरांचा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. यानंतर महापौर घोडले यांनी एमआयएमच्या नगरसेवकांना दिवसभरासाठी निलंबित केले.

आरोग्य विषयक वृत्त –

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?