Hasan Mushrif | ‘राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत अन् आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील प्राथमिक शिक्षकांची 30 जूननंतर जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी दिली. कोल्हापूरात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बदली पोर्टल सुरु करण्याबाबत मुश्रीफ Hasan Mushrif यांना निवेदन दिले होते. त्यावेळी मुश्रीफ Hasan Mushrif यानी ही ग्वाही दिली. तसेच शिक्षकांच्या बदलीसाठीची सेवेची अंतिम तारीख 31 मे ऐवजी 30 जून करावी, संवर्ग 4 मध्ये समाविष्ट शिक्षकांना एका शाळेवर 3 वर्षे सेवा पूर्ण झाल्यास विनंती बदलीसाठी पात्र समजावे. यासंदर्भात शासनाने त्वरीत शुध्दीपत्रक काढावे आदी मागण्याचे निवेदन शिक्षक संघाने मुश्रीफ Hasan Mushrif यांना दिले होते. याबाबत लवकरच शुद्धीपत्रक काढू मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी शासनाने दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी बदलीचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यासंदर्भातील सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. बदली धोरणानुसार जिल्हाअंतर्गत बदल्या 31 मेपर्यंत होणे बंधनकारक आहे. परंतु यंदा कोरोनामुळे 30 जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे स्वतालुक्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेक शिक्षकांची निराशा झाली होती. परंतु आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे .याच पार्श्वभूमीवर शिक्षक बदली पोर्टल सुरु करून प्राथमिक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी केल्याचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे आणि सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

wab title : district internal and inter district transfer process teachers will start state minister hasan mushrif