नियमांप्रमाणे काम करते म्हणून ‘टार्गेट’, ‘या’ महिला अधिकाऱ्याचा दावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मी नियमाप्रमाणे काम करते, म्हणून क्रीडा संघटनांनी मला टार्गेट केले आहे. शालेय क्रीडा स्पर्धाही नियमित सुरू आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. क्रीडा संघटनांनी त्यांच्या बदलीसाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नावंदे बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, ‘स्थानिक स्तरावर उत्पन्न वाढवावे असे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी ५०, तर नागरिकांसाठी १०० रुपये प्रवेश शुल्क घेत आहे.’

आजपर्यंतचा जमा-खर्च पत्रकारांनी विचारला असता त्यावर नावंदे निरूत्तर झाल्या. मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचा विषय माझ्या नियंत्रणात येत नाही. त्यामुळे किती खेळाडू येतात हे कळत नाही, असे सांगत त्यांनी ६०-४० च्या विषयाला बगल दिली. क्रीडा संकुलातील असुविधेबाबत कोणत्याच संघटनांनी लेखी पत्र दिले नाही. लेखी पत्रानंतर सुविधा देऊ, असे त्यांनी सांगितले. संघटनांनी मला जाणीवपूर्वक टार्गेट केले असून शालेय स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा वेळेवर झाल्या आहेत. कोणत्याही स्पर्धा झालेल्या नाहीत म्हणून बदलीसाठी आंदोलन झाल्याचे बातम्यांतून समजले. माझ्या बदलीसाठी हा खटाटोप असल्याचे त्या म्हणाल्या.

काल पत्रकार परिषद घेऊन क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या बदलीसाठी १७ ऑगस्टपासून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेत क्रीडा संघटना व शिक्षकांनी त्यांच्यावर जोरदार आरोप केले होते. त्या आरोपाला उत्तर देण्यासाठी नावंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र अनेक प्रश्नांची उत्तर देताना त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like