आवाज कमी कर डी जे तुला … शपथ हाय … 

मुंबई : वृत्तसंस्था 
गणेशोत्सवात सर्रास डॉल्बीचा दणदणाट ऐकायला मिळतो, डॉल्बी च्या तालावर कार्यकर्ते बेभान होऊन नाचतात. पण यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील  डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. १९ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता आवाज कमी कर डी जे तुला न्यायालयाची शपथ हाय असेच म्हणावे लागेल.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1f47dc0-b7f7-11e8-95bb-83bf50174482′]

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टमवर पूर्ण बंदी घातली आहे का याविषयी माहिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारला यासंदर्भात आज भूमिका स्पष्ट करायची होती. दरम्यान न्यायालायने डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी दिली नसून, सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे.

या कारणाने  गौतम गंभीरची ‘स्त्री ‘ वेशात एन्ट्री 

सण येत जात राहतील पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही अशा शब्दांत उच्च न्यायालयाने खडसावलं आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादित डेसिबलपर्यंतचा आवाज ठेवला तरी पोलीस कारवाई का करत आहेत असा सवाल प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग असोसिएशनने केला होता. कारवाई करत आमच्या व्यवसायावर गदा आणली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.