सलग 4 दिवस बँका बंद मग नो-टेन्शन, नाही अडकणार तुमचा पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक युनियनने दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. जो की २६ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. जर हा संप झाला तर पुढील आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. हा संप २६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर पर्यंत राहील. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन, ऑल इडिया बँक ऑफिसर्स एसोसिएशंस, इंडियन नेशनल बँक ऑफिसर्स कांग्रेस आणि नेशनल ऑर्गेनाइेशन बँक ऑफिसर्स यांनी २६ आणि २७ सप्टेंबरच्या संपाची घोषणा केली आहे. या युनियनने सरकारने दहा बँकांचे चार बँकांमध्ये केलेल्या विलीनीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी या संपाचे आयोजन केले आहे.

पुढील आठवड्यात तीन दिवसांसाठीच खुल्या असणार बँका
बँक युनियनने गुरुवारी आणि शुक्रवारी संपाची घोषणा केली आहे आणि त्यापुढील चौथा शनिवार असल्याने शनिवार व रविवारी बँक बंद असतील. यामुळे या सुट्ट्यांचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर देखील पडणार आहे. मात्र सोमवारी ३० तारखेला बँक खुली असणार आहे त्यामुळे नोकरदार वर्गाचे पगार अडकून राहणार नाहीत.

बँक सलग बंद असल्यामुळे चेक क्लेअरिंगसाठी सुद्धा वेळ लागणार आहे. तसेच सालगच्या सुट्ट्यांमुळे एटीएम सुद्धा मोकळे होऊ शकतात. संपामध्ये बँक बंद असणार आहेत मात्र कर्मचाऱ्यांचे काम सुरु असणार आहे त्यामुळे ऑनलाइन बँकिंग RTGS,  NEFT,  IMPS आणि UPI ट्रांसफर या सुविधा सुरु असणार आहेत.

बँक युनियनचा नोव्हेंबरमध्ये सुद्धा संपाचा इशारा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घोषित केला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवावे या मागणीसाठी बँक युनियनने इशारा दिला आहे की जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा संपावर जाऊ.

Visit – policenama.com