काळजी करू नका, मी सुरक्षीत आहे, दीपिका पदुकोनचं ट्विट

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन

प्रभादेवी येथील ‘बो मोंड’ टॉवरला आग दुपारी आग लागली आहे. या टॉवरमध्ये २६ व्या मजल्यावर प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोनचा फ्लॅट आहे. आग लागल्यानंतर दीपिका बद्दल सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे. यानंतर आता दीपिकाने ट्विटरवर ट्विट केले आहे.

आगीच्या घटनेनंतर सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरु होती. दीपिकाबद्दल प्रश्नही उपस्थित केले जात होते. दीपिका कुठे आहे ? ती सुरक्षित आहे का? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले होते.

परंतु , मी सुरक्षित आहे, काळजी करणाऱ्या सर्वांचे आभार. घटनास्थळी आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचं का करणाऱ्या फायर ब्रिगेडच्या जवानांच्या प्रयत्नांना यश येवो अशी प्रार्थना तिने ट्विटरद्वारे केली आहे .