7 डॉक्टर आणि 450 अभियंत्यांनी स्विकारली शिपायाची नोकरी, दिली ‘ही’ कारणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतेच 7 डॉक्टरांनी आणि 450 इंजिनिअर्सनी शिपाई पदासाठीची भरती सुरु असताना शिपाई पदाचा स्वीकार करून नोकरी सुरु केली आहे. एवढेच नाही तर कारण विचारल्यानंतर प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले आहे.

आता याला सरकारी नोकरीच्या प्रति तरुण वर्गातील क्रेझ म्हणा किंवा शिक्षण घेतलेल्या वर्गात नोकऱ्या उपलब्ध नसल्याचा परिणाम. श्रेणी 4 मधील पदांवर नोकरी मिळवण्यासाठी हजारो डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सचे अर्ज आले होते.

30 हजार रुपये मिळणार वेतन
या संबधीची भरती गुजरात उच्च न्यायालय आणि त्याअंतर्गत येणाऱ्या न्यायालयामध्ये शिपायांसहित श्रेणी 4 च्या एकूण 1149 पदांना भरण्यासाठी सुरु करण्यात आली होती. यासाठी एकूण 1,59,278 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 44,958 लोक पदवीधारक आहेत. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 डॉक्टरांना 450 इंजिनिअर्सला आणि 543 ग्रॅज्युएट पदवीधारकांनी श्रेणी 4 मधील या नोकरीचा स्वीकार केला आहे. यांना 30 हजार रुपये वेतन मिळणार आहे.

या कारणांमुळे उच्च शिक्षित लोकांनी स्वीकारली ही नोकरी
ही नोकरी स्वीकारणाऱ्या प्रत्येकाने आपली आपली वेगळी कारणे सांगितली आहेत. त्यांच्या मते ही सरकारी नोकरी आहे आणि यात बदलीची देखील काही चिंता नाही.

जे विद्यार्थी जज बनण्यासाठी योग्य होते त्यांनी सुद्धा श्रेणी 4 मधील नोकरीसाठी अर्ज केला आहे. त्यांनी याबाबतची परीक्षा देखील दिली आहे आणि लवकरच जॉईन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की एवढा अभ्यास करून देखील आमच्या लायक नोकऱ्या नाहीत. त्यामुळे आम्ही शिपाई बनण्यासाठी देखील तयार आहोत.

या पदवीधारकांनी स्वीकारली शिपायाची नोकरी
डिग्री – पदवीधर
अर्ज संख्या – 44958
निवड संख्या – 543

डिग्री – मेडिकल
अर्ज संख्या -19
निवड संख्या – 7

डिग्री – पदवीत्तर पदवी (PG)
अर्ज संख्या – 5727
निवड संख्या – 119

डिग्री – टेक पदवीधारक
अर्ज संख्या – 196
निवड संख्या – 156

डिग्री – बीटेक / बीई
अर्ज संख्या – 4832
निवड संख्या – 450

Visit : Policenama.com