Does Stress Affect Digestive Health | तणावामुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो का? जाणून घ्या कशाप्रकारे आतड्यांवर परिणाम करतात नेगेटिव्ह इमोशन

नवी दिल्ली : Does Stress Affect Digestive Health | मानवी मन आणि आरोग्य यांचा एकमेकांशी संबंध आहे. अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, वेगवान विकास आणि बदलत्या जीवनशैलीच्या या युगात, व्यक्तींमध्ये तणावाचे प्रमाण देखील चिंताजनक वेगाने वाढत आहे. ज्यामुळे शारीरिक आणि पचनशक्तीचे आरोग्य बिघडत आहे. (Does Stress Affect Digestive Health)

पचनशक्ती केवळ आपण काय खातो यावर अवलंबून नाही तर आपल्याला कसे वाटते यावरही अवलंबून असते. आनंद आणि दुःखासारख्या भावना थेट खाण्याच्या सवयींना ट्रिगर करतात. तणाव आणि चिंता शरीरात तणावाचे हार्मोन कॉर्टिसॉल तयार करतात, ज्याचा आतड्यांवर गंभीर परिणाम होतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Does Stress Affect Digestive Health)

डायजेस्टिव्ह इम्युनिटी
तणावामुळे अन्न पचवण्याची शक्ती कमी होते. पचनसंस्थेत हजारो चांगले आणि वाईट बॅक्टेरिया असतात, जे पचनास मदत करतात. तणावात असल्याने, शरीरात रासायनिक क्रिया होतात ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया काढून टाकले जातात. यामुळे इम्युनिटी कमकुवत होते आणि शरीरात सूज येते. प्रदीर्घ काळापर्यंत तणाव आणि मानसिक थकवा तसेच अस्वस्थता शारीरिक लक्षणे निर्माण करते.

बद्धकोष्ठता
सर्व पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी अन्न ठराविक काळासाठी पचनसंस्थेत राहावे लागते. तणावाखाली असताना, पचनसंस्था पूर्णपणे ठप्प होऊ शकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होते. त्यामुळे गॅस, सूज, पोटदुखी आणि वजन वाढणे यासारख्या समस्या होतात.

अल्सर
प्रदीर्घ तणावामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये अल्सर होऊ शकतो. या अल्सरमुळे आतड्याचे अस्तर खराब होते.
यामुळे वेदना, जळजळ आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. किरकोळ हानीपासून ब्लिडिंगपर्यत नुकसान होते.
तणावामुळे पोटात अ‍ॅसिडचे उत्पादन वाढते, ज्यामुळे अल्सर आणखी गंभीर होतो.

नियमित व्यायाम आणि मेडिटेशन
मेडिटेशन लक्ष केंद्रित करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते.
अनेक मेडिटेशन तंत्रे मन एका विशिष्ट विषयावर शांतपणे केंद्रित करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.
शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होतो आणि एंडोर्फिनच्या प्रवाहाला प्रोत्साहन मिळते, जे मेंदूमध्ये नैसर्गिक वेदना कमी
करणारे म्हणून काम करते. हे मेंदूला आराम देण्यास मदत करते आणि शांतता प्रदान करते.
योगामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तणाव कमी होतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurg Chipi Airport Maharashtra | 1 सप्टेंबर पासून चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार