कुत्र्याचा पाठलाग करणे बिबट्याला पडले महागात

जुन्नर : पोलीसनामा आॅनलाईन

जुन्नर तालूक्यातील बेल्हे येथे कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरात पडला. सहा ते सात तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’59c99b57-c89f-11e8-9553-41a830bab2e4′]

मिळालेल्या माहितीनूसार, यादववाडी येथे देवराम पिंगट यांची विहिर आहे. वंदना पिंगट या पहाटेच्या वेळी मोटार चालु करण्यासाठी विहिरीजवळ आल्या असता त्यांना विहिरीतुन विचित्र आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना मोटारीच्या पाईपाला धरुन बसलेला बिबट्या पहायला मिळाला. त्यांनी लगेच घरी जावून घरच्या व्यक्तिंना सांगितले. त्यानंतर घरच्यांनी विहिरीजवळ जावून पाहिले आणि तात्काळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली.
वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथे येवून विहिरीत पडलेला बिबट्या पाहिला. बिबट्याच्या बाजूलाच त्यांना मेलेला कुत्राही पहायला मिळाला. यावरुन त्यांच्या लक्षात आले कि, कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माणिकडोह येथुन पिंजरा आणला. त्या पिंजऱ्याला चारही बाजूंनी दोर बांधून तो विहिरीत सोडला. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. तब्बल सहा ते सात बिबट्या पाण्यातच होता. तो खुप थकलेला होता. पिंजऱ्यात अडकल्यानंतर तो बिबट्या तेथे जमलेल्या लोकांवर गुरगुरत होता.

शांततेच्या नोबेल पुरस्कराच्या शर्यतीत होते डोनाल्ड ट्रम्प,  हुकूमशाह किम-जोंग-उन

हा बिबट्या मादी जातीचा असुन तो सहा वर्ष वयाचा आहे. बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याला बाहेर काढून माणिकडोह येते हलविण्यात आले आहे. याठिकाणी वनकर्मचारी डी.डी.फापाळे, जे.टी.भंडलकर,बी.एस.शेळके,पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर,पोलीस व डॉ.ढोरे यांचे विशेष पथकाने विशेष सहकार्य केले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70ba41e6-c89f-11e8-933e-0fea3cb0308d’]