Dolly Khanna Portfolio | डॉली खन्ना यांचे ‘हे’ स्टॉक ठरले कुबेराचं धन; 6 महिन्यामध्ये अडीच पट रिफंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Dolly Khanna Portfolio | अनेक लोक शेअर मार्केटमध्ये (Stock Market) आपली गुंतवणूक करीत असतात. एक व्यवसाय म्हणून अधिकाधिक लोक शेअर मार्केटकडे वळताना दिसत आहे. दरम्यान सध्या तर शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे लक्ष असते. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala), आर के दमानी (R. K. Damani) पासून ते डॉली खन्ना (Dolly Khanna Portfolio) यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत. याकडेच सर्व किरकोळ गुंतवणूकदारांच्या नजरा असतात. मागील 6 महिन्यात डॉली खन्ना यांनी गुंतवणूक (Investment) केलेला एक स्टॉक त्यांच्यासाठी एक संपत्ती ठरली आहे. दरम्यान, या स्टॉकने केवळ सहा महिन्यात अडीच पट रिफंड (Refund) देण्यात आलाय.

 

डॉली खन्ना यांनी केलेल्या गुंतवणुकीचा स्टॉक म्हणजे अजंता सोया कंपनी (Ajanta Soya Ltd) आहे. या शेअरमध्ये 1.1 टक्क्यांची भागिदारी खरेदी करण्यात आली आहे. अजंता सोयाचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने सहा महिन्यामध्ये गुंतवणुकदारांना अडीच पट रिफंड दिला गेला आहे. अजंता सोया कंपनी वनस्पती ऑइल, कुकिंग ऑइल आणि बेकरी ऍप्लिकेशनची मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटींगचे काम करते. यामुळे कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटमध्ये चांगली मागणी देखील आहे. (Dolly Khanna Portfolio)

डॉली खन्ना यांची स्टाॅक मधील पार्टनरशिप –
बीएसईच्या वेबसाईटवर अजंता सोया लिमिटेडच्या डिसेंबर 2021 तिमाही शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार,
गुंतवणूकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) यांनी या कंपनीत 1.11 टक्के (178500 इक्विटी शेअर) पार्टनरशीप अर्थात भागिदारी खरेदी केली आहे.
आज (बुधवारी) डॉली खन्ना यांची होल्डिंग वॅल्यू 4.8 कोटी रुपयांवर आहे.

 

दरम्यान, डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेल्या अजंता सोया (Ajanta Soya Ltd) या स्टॉकने मागील सहा महिन्यात जबरदस्त वाढ नोंदवली आहे.
तर, स्टॉकने गुंतवणूकदारांना 155 टक्क्यांचा भरपुर परतावा दिला आहे.
मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 265 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली आहे.

 

Web Title :- Dolly Khanna Portfolio | ajanta soya stock invested by dolly khanna gave a huge return in just 6 month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uttarakhand Election 2022 | दिवंगत जनरल बिपीन रावत यांचे भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

Pune Corporation | पुणे मनपाच्या आकाशचिन्ह विभागाने शहरातील 42000 बेकायदा फ्लेक्स, बॅनर हटविले

 

Pune Crime | सुरक्षा रक्षक बनले ‘देवदूत’, डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेल्या ‘स्वर्णव’ला सुखरुप पोहचवलं पालकांकडे