Pune Crime | सुरक्षा रक्षक बनले ‘देवदूत’, डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेल्या ‘स्वर्णव’ला सुखरुप पोहचवलं पालकांकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण (Dr. Satish Chavan) यांच्या चार वर्षाच्या स्वर्णव उर्फ डुग्गुचे (Swarnav alias Duggu Satish Chavan) 11 जानेवारी रोजी भरदिवसा अपहरण (Kidnapping Case in Pune) करण्यात आले होते. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) तक्रार दाखल करण्यात आली होती. डुग्गूचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस (Pune Police) यंत्रणा कामाला लागली होती. अखेर आज (बुधवार) आठ दिवसांनी डुग्गू सापडला. 11 जानवारी रोजी त्याचे बालेवाडीतून (Balewadi) अपहरण झालं होतं. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळली होती. जवळपास 300 ते 350 पोलीस कर्मचारी स्वर्णवचा शोध घेत होते. अखेर आज वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीतील पुनावळे (Punawale) येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.

सुरक्षा रक्षक दादाराव जाधव बनले ‘देवदूत’

आज बुधवारी दुपारी अपहरण झालेल्या चिमुकल्याला पूनावळे येथे आरोपीने सोडून दिलं होतं. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांकडे सुखरूप सुपुर्द केले. मुलगा सुखरुप असून कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षारक्षक दादाराव जाधव (Security Guard Dadarao Jadhav) यांच्याजवळ स्वर्णव याला सोडण्यात आलं होतं. आरोपीने स्वर्णव याला त्यांच्याकडे सोपवून तेथून पळ काढला. दादाराव जाधव यांनी मुलाच्या बॅगेवरील नंबरवर फोन करुन याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर स्वर्णव आपल्या घरी सुखरूप पोहोचला. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी सांगितले की, अपहरण झालेला मुलगा सुखरुप मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. लवकरच आम्ही आरोपी पर्यंत पोहोचू.

पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve) यांनी सांगितले की, मागील 8 दिवसांपासून आम्ही मुलाचा शोध घेत होतो. पोलिसांची अनेक पथके दिवस रात्र काम करीत होती. आज दुपारी मुलगा पुनावळे येथे मिळून आला. तो सुखरुप असून त्याला त्याच्या आई-वडीलांकडे सुपुर्द केले आहे.

Web Title :Pune Crime | swarnav-alias Duggu Satish Chavan kidnapping case
rescued from punawale pune police crime branch police dadarao jadhav rescued child

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे