Dombivli Gang Rape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण ! आरोपींकडून अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –  Dombivli Gang Rape Case | येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जणांनी ९ महिने सामूहिक बलात्कार केल्याची घटना २२ सप्टेंबरला उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. पीडितेच्या भावानेच आरोपीच्या मित्राशी तिची ओळख करून दिली. त्यानंतर त्या मित्राने या प्रकरणातील मुख्य आरोपीशी पीडितेची ओळख करून दिल्यानंतर हे अत्याचार (Dombivli Gang Rape Case) सत्र सुरु झाले. या मुलीला गुंगीचे औषध देऊन तर कधी दारू पाजून अत्याचार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करताना आरोपींनी अनेकदा कंडोमऐवजी (condom) प्लॅस्टिकच्या पिशवीचा (plastic bag) वापर केल्याची माहिती समोर आली आहे.

२९ जानेवारी २०२१ ला पीडितेला आपले घर दाखवतो असं सांगून आरोपी मित्राच्या घरी घेऊन गेला.
तेथे अश्लील व्हिडीओ दाखवून पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला.
घरात उपस्थित असणाऱ्या अन्य जणांनीही पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला.
या घटनेनंतर पीडितेने सर्व आरोपींशी संपर्क तोडला आणि त्यांचे मोबाइल नंबर डिलीट केले.
मात्र फेब्रुवारीत आरोपीने पुन्हा पीडितेला फोन करून भेटायला बोलवू लागला. तसेच भेटायला आली नाही.
तर तुझे नग्न व्हिडीओ तुझ्या आई वडिलांना दाखवेन अशी धमकीही आरोपीने दिली. या धमकीला घाबरून पीडिता आरोपीला भेटायला गेली.
त्यावेळी आणखी एका मित्राच्या घरी नेऊन आरोपीने शीतपेयातून पीडितेला गुंगीचं औषध दिलं.
पण पीडितेनं संबंधित शीतपेय पिण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तुला विना कपड्याची घरी पाठवेन अशी धमकी दिली.
त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
मुख्य आरोपीने तिच्यावर केलेल्या बलात्काराचा व्हिडीओ काढून तिला अनेकदा ब्लॅकमेलही केलं आहे.
व्हिडीओच्या आधारे आरोपींनी तिच्यावर आठवेळा सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केला आहे.

 

२२ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीही सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.
आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडितेने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि या प्रकरणाला वाचा फुटली. अधिक तपास मनपाडा पोलीस करत आहेत.

 

Web Title : Dombivli Gang Rape Case | dombivli gang rape case threat to viral obscene video use plastic bag instead of condom

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार नवा महामार्ग

Gold Silver Price Today | खूशखबर ! सप्टेंबरमध्ये सोन्या-चांदीची किंमत सर्वात कमी, जाणून घ्या

Maharashtra Cinema Hall Reopen | राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार