महावितरणकडून ग्राहकांना ‘शॉक’, शिवसेनेसह मनसेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी जाऊ नये, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, या काळातील मीटर रीडिंग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बील आकारणी करण्यास सुरुवात झाली आहे. आता मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिन्यांचे भरगच्च बील हातात पडल्याने ग्राहकांना जोरदार शॉक बसला आहे.

कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे अनेकांना कामे मिळत नाहीत. नोकऱ्या गेल्या आहेत आणि पगार सुद्ध कपात झाली आहे. त्यात आता नागरिकांना महावितरणने हजारो रुपयांची बिले पाठवून शॉक दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्याची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी ऊर्जा मंत्र्यांकडे केली आहे. तर ग्राहकांकडून 3 महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत. यावर समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा या विरोधात लोकांसोबत मनसेही मैदानात उतरेल असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

दुसरीकडे नागरिकांच्या बिलाची दुरुस्ती न केल्यास महावितरणवर धडक देणार असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांना अवास्तव आलेली विजबिले नागरिकांनी शाखेत जमा करावीत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ग्राहकांना आलेली बिले ही तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहेत, सुधारीत बिले द्या अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोरोना संकट, लॉकडाऊनमुळे अनेकांना कामे मिळत नाहीत. नोकऱ्या गेल्या आहेत आणि पगारात देखील कपात झाली आहे. महावितरणने ग्राहकांकडून तीन महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत. यावर समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा या विरोधात लोकांसोबत मनसेही मैदानात उतरले, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.