Don 3 Teaser Out | डॉन 3 चित्रपटाचा जबरदस्त टीझर आऊट; रणवीर सिंग दिसणार प्रमुख भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाइन – Don 3 Teaser Out | बॉलीवुडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचे सिक्विल सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यामध्ये आता फरहान अख्तरच्या डॉन फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागाची देखील घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डॉन’ (DON Movie) व ‘डॉन 2’ (DON 2 Movie) या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मात्र आता ‘डॉन 3’ मध्ये शाहरुखच्या ऐवजी नवीन चेहरा दिसणार आहे. चित्रपट निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) याच्या डॉन 3 चा टीझर रिलीज करण्यात आला असून आता डॉनची भूमिका अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) साकारणार आहे. ‘डॉन 3 – द चेस एंड’चा जबरदस्त टीझर (Don 3 Teaser Out) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘डॉन’ या फ्रेंचायझीच्या पुढील भागाची प्रतिक्षा करत होते. निर्माता फरहान अख्तरने चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट केल्याने सर्वांना याबाबत अधिक उत्सुकता लागली होती. चित्रपटामध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा देखील अनेक दिवसांपासून रंगली होती. मात्र आता चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून ‘डॉन 3’ मध्ये रणवीर सिंग प्रमुख भूमिका (Ranveer Singh In Don 3) साकारणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘डॉन 3 – द चेस एंड’ च्या (Don 3 – The Chase End) जबरदस्त टीझरमध्ये सुरुवातीला डॉन हा पाठमोरा दाखवण्यात
आला असून भारदस्त डायलॉग ऐकायला मिळत आहे. या डायलॉगमुळे प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.
पुढे अभिनेता रणवीर सिंगची जॅकेट मागे करत व स्टाईलने सिगारेट पेटवत एन्ट्री दाखवण्यात आली आहे.
यामध्ये तो “ग्यारह मुलखों के पुलिस ढूंढती है मुझे, पर पकड़ पाया है मुझको कौन, मैं हू डॉन…! आणि “ ‘शेर जो सो रहा है,
वो जागेगा कब? पूछते हैं ये सब, उनसे कह दो, फिर जाग उठा हूं मैं.”
अशा डायलॉगमध्ये रणवीर सिंगची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. ‘डॉन 3’ चित्रपटाची निर्मिती आणि लेखन फरहान अख्तर याने केली असून चित्रपटात हाय टेक ड्रामा व फायटिंग पाहायला मिळणार आहे. ‘डॉन 3’ (Don 3 Teaser Out) या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आली नसून चित्रपट 2025 साली (Don 3 Release Year) प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाच्या टीझरमध्ये जाहीर करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Late MLA Mukta Tilak | आमदार स्व.मुक्ता टिळक यांच्या जयंतीनिमित्त कर्करुग्णांवर मोफत उपचार व तपासणी शिबिराचे 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजन

Pune Police News | हडपसर पोलिसांकडून अल्पवयीन मुलांसाठी मार्गदर्शन शिबीर

Jailer Movie | रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटानिमित्त चेन्नई शहर सजलं; सर्वत्र लागलेत पोस्टर