‘कोरोना’च्या भीतीने घाबरू नका, दक्षता घ्या : इंदिरा अहिरे

पुणे : कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे 22 मार्चपासून देशभर लॉकडाऊन होते. आता लॉकडाऊन शिथील केले आहे. मात्र, नागरिकांनी कोरोना संपला किंवा गेला असे समजू नये. कोरोनाच्या भीतीने नागरिकांची घाबरून न जाता धीराने सामोरे गेले पाहिजे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सदस्या इंदिरा अहिरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी पार्वती बनसोडे, डॉ. रवींद्र छाजेड आणि नागरिक उपस्थित होते.

अखिल भारतीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अहिरे व परिवाराच्या वतीने पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये मास्क आणि सॅनिटरी नॅपकिनचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अहिरे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमधील अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर, महिला कर्मचाऱ्यांना सॅनिटरी नॅपकिन देण्यात आले. तसेच बिबवेवाडी येथील डॉक्टर व कर्मचारी यांनाही मास्क आणि सॅनिटायझर, महिलांना सॅनिटरी नॅपकिन, मास्क वाटप केले.

अहिरे म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, पोलीस स्वच्छता दूतांचे काम रात्रंदिवस सुरू आहे. आपण त्यांना साथ दिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.