नक्षलवाद्यांचा दूरदर्शनच्या टीमवर हल्ला ; दोन पोलिसांसह पत्रकाराचा मृत्यू

दंतेवाडा : वृत्तसंस्था  – छत्तीसगड येथील दंतेवाडाच्या अरनपूर भागातील  दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षलवाद्यांकडून हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे.  या घटनेत दोन पोलीस शहीद झाले असून दूरदर्शनच्या  दूरदर्शनच्या कॅमेरामनचा मृत्यू झाला आहे. अच्युतानंद साहू असं कॅमेरामनचं नाव आहे. या घटनेमुळे या भागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, छत्तीसगडच्या विजापूर जिल्यातही  शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या अशाच प्रकराच्या हल्ल्यात चार जवानांना आपले प्राण गमावावे लागले होते. नक्षवाद्यांच्या हल्ल्यांनी दंतेवाडा, विजापूर जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणुकीचे दिवस असताना नक्षवाद्यांनी सुरू केलेल्या या कारवायांमुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत.
दूरदर्शनची टीम या भागात नेमकी कशासाठी गेली होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही टीम परतत असताना झाडीत दबा धरून बसलेल्या नक्षलींनी अचानक हल्ला चढवला. नक्षलींच्या हल्ल्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले आहेत.