Dr. Narendra Dabholkar | 5 आरोपींवर मंगळवारी होणार आरोप निश्चिती ! डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात, सुनावणीतील महत्त्वाचा टप्पा

पुणे : Dr. Narendra Dabholkar | गेल्या आठ वर्षांपासून न्यायालयीन सुनावणी सुरू असलेल्या आणि अद्याप सुत्रधार फरार अससेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar Murder Case) हत्येमधील पाच आरोपींवर मंगळवारी (७ सप्टेंबर) आरोप निश्चित करण्यात येणार आहे. डॉ. दाभोलकर यांचा खून करणा-यांना शिक्षा सुनावण्यासाठी हा खटल्यातील महत्त्वाचा टप्पा आहे.

या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. तर आरोपी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. या पाच जणांवर आरोप निश्‍चिती करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून ॲड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी खटल्याची पार्श्वभूमी सांगत शुक्रवारी आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची मागणी केली. तर आरोपींवर कोणत्या कलमांखाली आरोप निश्चिती करायची आहे. याबाबत मंगळवारी सुनावणी होणार असून, त्यासाठी सर्व आरोपींना प्रत्यक्ष किंवा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. आरोप निश्चितीला विरोध करताना तपास यंत्रणांच्या तपासावरच बचाव पक्षाने आक्षेप घेतला. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सीबीआयच्या दोषारोपपत्रात विसंगती असल्याचा युक्तिवाद केला.

हे देखील वाचा

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

e-Shram Portal | फायद्याची गोष्ट ! आजच करा e-Shram Portal वर आपले ‘रजिस्ट्रेशन’ आणि घ्या अनेक सरकारी लाभ; जाणून घ्या

Pune Court | मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे; पत्नी आणि मुलानेही केली मदत, जाणून घ्या आज कोर्टात काय झालं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Dr. Narendra Dabholkar | 5 accused to be charged on Tuesday Dr. In the Narendra Dabholkar murder case, an important stage in the hearing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update