Dr Neelam Gorhe On Girish Bapat | गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : Dr Neelam Gorhe On Girish Bapat | दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला. त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.

२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले.
या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे,
संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते.
ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून
त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.

Web Title :-  Dr Neelam Gorhe On Girish Bapat | There will never be a leader like Girish Bapat again – Dr. Neelam Gorhe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, ‘त्या’ प्रकरणात होता आरोपी

Congress Mohan Joshi On Pune BJP MP Girish Bapat | विकासाची दृष्टी असलेला नेता हरपला – मोहन जोशी