Dr Neelam Gorhe | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा’; नीलम गोऱ्हेंच्या एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे सूचना

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Dr Neelam Gorhe | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे’वर (Mumbai Pune Expressway) सातत्याने मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ होताना समोर आले आहे. दिनांक १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात चार लोकांचा जीव गमवावा लागला आहे. अंजनी पुल असो नाहीतर त्यापुढे अगोदरच मोठ्या प्रमाणात उतार असल्याने भरधाव वेगात गाड्या येत असतात. याच पार्श्वभूमीवर उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम विभाग (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना उपाययोजना करण्यासाठी पत्र देऊन सूचना केल्या आहेत.

 

नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी पत्राद्वारे केलेल्या सूचना-
रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे घाट सुरू होत असताना म्हणजे जेथे काम सुरू आहे त्यापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर काम सुरू असल्याचे बोर्ड लावून वाहन चालकांना सावधान करण्यात यावे.

 

घाट सुरू होत असतानाच आणि घाट मध्ये देखील स्पीकर लावून गाड्या सावकाश चालवण्याबाबत जाहीर निवेदन (Public Statement) करण्यात यावे.

 

अपघात रोखण्यासाठी गाड्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी (Police) वेगाने गाड्या चालवणाऱ्यावर कडक करवाई करण्यात यावी.

अपघात (Accident) रोखण्यासाठी ज्या ज्या आवश्यक उपयोजना आहेत त्या त्या करण्यासाठी एमएसआरडीसी यांना सूचना कराव्यात, असे पत्र डॉ. गोऱ्हे यांनी म्हंटले आहे. तसेच चंद्रकांत फुलकुंडवार, सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पोलीस अधीक्षक संजय जाधव (SP Sanjay Jadhav) महामार्ग पोलीस विभाग, पुणे (Pune) यांना दूरध्वनीद्वारे तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकारांना दिले आहेत.

 

 

Web Title :- Dr Neelam Gorhe | ‘Take measures to prevent accidents on Mumbai-Pune Expressway’; suggestion by letter to Eknath Shinde, Aditya Thackeray of Dr Neelam Gorhe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

तुमचे Gmail अकाऊंट आणखी कुणी वापरत आहे का? हे जाणून घेण्याची ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

 

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दिवसाला 50 रुपयांची करा बचत, मॅच्युरिटीवर मिळतील 35 लाख रुपये

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2068 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी