Sarkari Naukri : DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे नोकरी मिळवण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. डीआरडीओने थेट भरती आयोजित केली असून, त्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. ही भरती ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अ‍ॅप्रेंटिसच्या पदांवर होणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घेऊया.

पदांची नावे व संख्या

ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण 15 पदांवर भरती करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

image.png

महत्वाच्या तारखा

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 14 ऑक्टोबर 2020
मुलाखतीची (थेट मुलाखत) तारीख: 13 नोव्हेंबर 2020

असा करावा अर्ज

आपण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या या https://www.drdo.gov.in/careers अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.