Drink For Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी प्यावा ‘हा’ हिरव्या रंगाचा ज्यूस, केवळ 120 मिनिटात नॉर्मल होईल Blood Sugar

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Drink For Diabetes | टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे जिचा कायमस्वरूपी इलाज नाही. या आजारात शरीराद्वारे इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा होत नाही. इन्सुलिन हे एक हार्मोन आहे, जो रक्ताद्वारे शरीरातील पेशींमध्ये ग्लुकोज पाठवण्याचे काम करते. म्हणजेच शरीरातील ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) करते. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात (Drink For Diabetes).

 

जर तुम्ही टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण (Type 2 Diabetes Patients) असाल, तर तुम्ही ब्लड शुगर नियंत्रित करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकस आहार आणि व्यायाम किंवा योगासने (Healthy Diet And Exercise Or Yoga) करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांचे मत आहे की औषधांव्यतिरिक्त, काही खाण्यापिण्याच्या सेवनाने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

 

NCBI वर प्रकाशित अभ्यासानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी गडद हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. आपण भाज्यांचा ज्यूस (Vegetables Juice) देखील पिऊ शकता. हिरव्या कारल्याचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते. साखरेच्या रुग्णांची जेवणादरम्यान ब्लड शुगर वाढते, असे मानले जाते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

 

1. दररोज सकाळी प्या कारल्याचा ज्यूस (Drink Bitter Gourd Juice Every Morning)
टाईप 2 मधुमेहामध्ये कारल्याच्या ज्यूसचा परिणाम पाहण्यासाठी एक अभ्यास केला गेला. संशोधकांना असे आढळून आले की दररोज सकाळी ताज्या कारल्याचा ज्यूस (75 ग्रॅम) प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवता येते (Drink For Diabetes).

2. फक्त 2 तासांत दिसून येईल प्रभाव (Effect Will Appear In Just 2 Hours)
संशोधकांच्या मते, जेवणानंतर किंवा फास्टिंगनंतर कारल्याचा ज्यूस प्यायल्याने ब्लड शुगर कमी होऊ शकते. फास्टिंगच्या बाबतीत, ब्लड शुगर जेवणानंतर आठ तासांनी मोजली जाते, तर ब्लड शुगर जेवणानंतर दोन तासांनी मोजली जाते. या दोन्ही बाबतीत कारल्याचा ज्यूस गुणकारी आहे.

 

3. कारल्याची भाजीही फायदेशीर (Bitter Gourd Vegetable Is Also Beneficial)
कारल्यामध्ये इन्सुलिनसारखे कार्य करणारे संयुग असते. खरं तर, कारले टाईप 1 आणि टाईप 2 (Type 1 And Type 2 Diabetes)
या दोन्ही मधुमेहांमध्ये ब्लड शुगर कमी करते.
एक ग्लास कारल्याचा ज्यूस पिणे इतके प्रभावी आहे की साखरेच्या रुग्णांना त्यांच्या औषधांचा डोस कमी करावा लागतो.

 

4. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Useful For Weight Loss)
संशोधकांचे म्हणणे आहे की कारल्याचा ज्यूस केवळ ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठीच नाही
तर महिला आणि पुरुषांमध्ये वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
याच्या सेवनाने कंबर आणि नितंबांवर जमा झालेली चरबी कमी होऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Drink For Diabetes | ncbi study reveal drinking bitter bitter gourd juice or karle ka juice lowers blood sugar within 120 minutes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lifestyle After 40 | वयाच्या चाळिशीनंतर करा राहणीमानात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

 

Chickenpox | ‘या’ हंगामात चिकनपॉक्स संसर्गाचा धोका वाढतो; जाणून घ्या त्याची लक्षणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

 

Liver | ‘या’ सवयींमुळे होत यकृत निकामी, जीवनशैलीत बदल करा नाहीतर आजारी पडाल